केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, आमदार अमोल जावळे यांनी केले श्रमदान

‘सेवा पंधरवडा’ अंतर्गत फैजपूरमध्ये स्वच्छता अभियान
फैजपूर, ता. यावल (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “स्वच्छता हीच सेवा” या संकल्पनेनुसार तसेच “सेवा पंधरवडा” अंतर्गत भारतीय जनता पार्टीतर्फे फैजपूर येथे २० सप्टेंबर रोजी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे आणि आमदार अमोल जावळे यांनी यावेळी श्रमदान करून या अभियानात भाग घेतला.
१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत आयोजित “सेवा पंधरवडा २०२५” कार्यक्रमाचा भाग म्हणून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “स्वच्छता हीच सेवा” या संकल्पनेनुसार २० रोजी भारतीय जनता पार्टीतर्फे रावेर विधानसभा अंतर्गत फैजपूर, ता. यावल येथे केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य स्वच्छता अभियान पार पडले.
या अभियानात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यांसह संपूर्ण परिसराची स्वच्छता करून श्रमदान करण्यात आले. यावेळी स्थानिक भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.




