धार्मिक सण व उत्सवानिमित्त जिल्ह्यात पोलिसांचा दांडगा बंदोबस्त

नवदुर्गा विसर्जन मार्गावर CCTV कॅमेराद्वारे निगराणी; ६२९ लोकांना केले तडीपार
जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील आगामी सण आणि उत्सव शांततेत व सुव्यवस्थित पार पडावेत यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. २ व ३ ऑक्टोबर या काळात नवदुर्गा विसर्जन, दसरा, रावण दहन व धम्मचक्र प्रवर्तन दिन, RSS पथसंचलन या कार्यक्रमांदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ठिकठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच मुख्य चौकात विसर्जन मार्गावर CCTV कॅमेराच्या निगराणी ठेवण्यात येणार आहे.
सण, उत्सव साजरे करताना कायदा व सुव्यवस्था बिघडू नये तसेच कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. तसेच पोलीस दल, दंगल नियंत्रण पथके विशेष लक्ष ठेवून आहे. स्थानिक नागरिकांनी आपले सण, उत्सव साजरे करताना पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
दोन दिवसात जिल्ह्यात विविध कार्यक्रम
जिल्ह्यात २ ऑक्टोबर रोजी नवदुर्गा विसर्जन सार्वजनीक ३४१, खाजगी १०९, २५ ठिकाणी RSS पथसंचलन होणार असुन १६ ठिकाणी रावन दहन असे कार्यक्रम होणार आहेत. तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मिरवणुका, पुतळापुजन, प्रतिमा पुजन कार्यक्रम होणार आहेत तसेच ३ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात नवदुर्गा विसर्जन सार्वजनीक १५२८, खाजगी -१८२ यासह पारोळा, धरणगाव, चोपडा, मेहुणबारे (बहाळरथाचे) या ठिकाणी रथउत्सव होणार आहेत.
कायदा व सुव्यवस्थेसाठी विविध बैठका
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नवदुर्गा उत्सव अनुषंगाने पोलीस स्टेशन स्तरावर नवरात्र मंडळाच्या ८१ बैठका, मोहल्ला कमिटी-३० बैठका, शांतता समिती ४१ बैठका, मौलाना धर्मगुरु यांचे १० बैठका वाद्य धारक २८ बैठका, पोलीस पाटील – ३३ बैठका, पोलीस मित्र १४ बैठका इतर विभागाचे २८ बैठका घेण्यात आल्या आहेत. २ रोजी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने २४:०० वाजे पावेतो ध्वनी क्षेपकाची परवानगी आहे. त्यानंतर इतर दिवशी मिरवणुकांना रात्री २२:०० वाजे पर्यंत वाद्य वाजविण्याची परवानगी आहे.
६२९ लोकांना केले तडीपार
जळगाव जिल्ह्यात सन उत्सव कालावधीत अनुचित प्रकार घडु नये म्हणुन प्रतिबंधक कारवाया करण्यात आलेल्या आहेत.
- BNSS १२६ अन्वये – ४२८ लोकांकडुन शांतता राखण्यासाठी बॉन्ड भरुन घेतले
- BNSS १२८ अन्वये – ०५ लोकांकडुन शांतता राखण्यासाठी चांगल्या वर्तवणुकीसाठी बॉन्ड भरुन घेतले
- BNSS १२९ अन्वये -३० लोकांकडुन शांतता राखण्यासाठी चांगल्या वर्तवणुकीसाठी बॉन्ड भरुन घेतले
- BNSS १६३ अन्वये – ६२९ लोकांना पोस्टे हद्दीतुन तडीपार करण्यात आले आहे.
- BNSS १६८ अन्वये- २६४९ लोकांना शांतता राखण्यासाठी नोटीसीव्दारे समज देण्यात आली आहे.
- म.पो.का. कलम ५५,५६ अन्वये -८ लोकांना हद्दीतुन हद्दपार करण्यात आले आहे.
- MPDA अन्वये – २ इसमांवर हद्दपार कारवाई करण्यात आलेली आहे.
पोलीस बंदोबस्त असा
जळगाव जिल्ह्यात २ व ३ ऑक्टोबर रोजी जळगाव जिल्हयातील एक पोलीस अधिक्षक, अपर पोलीस अधीक्षक ०२, पोलीस उपविभागीय अधीकारी०८ पोलीस निरीक्षक – २९, सहा. पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक १४३, पोलीस अंमलदार-२४९७, RCP प्लाटुन -०८, SRPF प्लाटुन -०३QRT -०२, स्ट्रा. फोर्स०८, होमगार्ड -१६००-२०० अशा स्वरुपाचा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.
मुख्य चौकात विसर्जन मार्गावर CCTV कॅमेरे
पोलीस महासंचालक म.रा. मुंबई यांचे आदेशाने एक मंडळ एक पोलीस अंमलदार ही योजना राबविली असुन तसेच दुर्गा देवी विसर्जन मार्गावर एक कॅमेरा पोलीसांसाठी या संकल्पनेतुन CCTV कैमेरा बसविण्यात आले आहे तसेच मुख्य चौकात विसर्जन मार्गावर CCTV कॅमेराच्या निगराणीमध्ये आहोत असे फलक लावण्यात आले आहे.
नवदुर्गा मंडळे व रावण दहन आयोजक व जनतेस सुचना
▪️नवरात्र उत्सव काळात वाद्य मोठ्या आवाजात वाद्य लावु नये व आवाजाची मर्यादा ७५ डेलीबल पेक्षा कमी ठेवावी.
▪️नवदुर्गा मंडळानी विसर्जन मिरवणुका आपल्या निर्धारीत व पारंपारीक मार्गाने मिरवणुका काढाव्यात.
▪️मिरवणुका ठरवुन दिलेल्या निर्धारीत वेळेत पुर्ण कराव्यात.
▪️इतर धर्मियांचे धार्मिक भावना दुखावणार नाहीत अशा प्रकारचे हावभाव, गाणे, वाद्य वाजवु नये.
▪️मिरवणुकीत कोणत्याही धर्मियांच्या भावना दुखावतील असे देखावे सादर करु नये.




