रावेरच्या स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यामंदिरात गुंतवणूक साक्षरता कार्यक्रम

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी उपक्रम
रावेर (प्रतिनिधी) : श्री रामदेवजी बाबा ग्रामीण शिक्षक प्रसारक मंडळ संचालित स्वामी विवेकानंद प्राथमिक माध्यमिक व इंग्लिश माध्यमिक स्कूल यांच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी गुंतवणूक साक्षरता कार्यक्रम घेण्यात आला. जळगाव येथील एन्जे वेल्थतर्फे हा उपक्रम स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यामंदिर, रावेर येथे राबविण्यात आला.
एन्जे वेल्थचे ब्रांच मॅनेजर सुयोग महाजन, युटीआय म्युच्युअल फंड एरिया मॅनेजर लवेश शाह व एन्जे वेल्थचे पार्टनर जितेंद्र दांडगे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. कार्यक्रमामध्ये मान्यवरांनी आपल्या परिवाराची आर्थिक सुरक्षितता, विमा संरक्षण व परिवारासाठी संपत्तीचे निर्माण म्युच्युअल फंडद्वारे कसे करावे याची संपूर्ण माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन आर. डी. पाटील यांनी केले. या कार्यक्रमात संस्थेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




