जळगावताज्या बातम्यानिवडनिवडणूकराजकारणराष्ट्रीय-राज्य

“राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता” सेवा पंधरवड्यानिमित्त जळगाव जिल्हा पश्चिम भारतीय जनता पार्टी कार्यशाळा

जळगाव (प्रतिनिधी) : जी. एम. फाऊंडेशन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस (१७ सप्टेंबर) ते राष्ट्रपिता महात्मा गांधीजी जयंती (२ ऑक्टोबर) या कालावधीत साजरा होणाऱ्या “राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता – सेवा पंधरवडा” या अभियानाच्या अनुषंगाने जळगाव जिल्हा पश्चिम भारतीय जनता पार्टीची विस्तृत कार्यशाळा घेण्यात आली.

या कार्यशाळेत खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, माजी आमदार दिलीप वाघ, जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, जळगाव शहर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, माजी जिल्हा परिषद सभापती पोपटतात्या भोळे, वैशालीताई सूर्यवंशी, अमोल शिंदे यांच्यासह जिल्हा व प्रदेश कार्यकारणी सदस्य, मंडळ अध्यक्ष आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली व जिल्ह्याचे संकटमोचक नेते मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनात हा सेवा पंधरवडा प्रभावी व यशस्वी करण्याचा संकल्प सर्वांनी एकदिलाने केला.

योग्य व्यक्तीला योग्य वेळी संधी देण्याचे काम पक्ष करतो – खासदार स्मिताताई वाघ
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना खासदार स्मिताताई वाघ यांनी कार्यकर्त्यांनी सातत्याने पक्षाचे काम करीत राहिले पाहिजे. राजकारणात संधी मर्यादीत असल्या तरी योग्य व्यक्तीला योग्य वेळी संधी देण्याचे काम भारतीय जनता पार्टी मध्ये होत असते. ज्यांना संधी मिळाली नाही. त्यांचाही विचार आगामी काळात पक्ष नेतृत्व निश्चितपणे करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांनी आपल्या मनोगतात सांस्कृतिक राष्ट्रवाद, राष्ट्र प्रथम, एकात्म मानवतावाद, सकारात्मक सर्वधर्म समभाव, अंत्योदय, मूल्य आधारित राजकारण या भाजपच्या विचारधारेवर गाढ विश्वास ठेवून काम करायचे आहे, असे सांगितले.

सेवा हीच संघटना, सेवा हाच संकल्प – आमदार मंगेश चव्हाण
भारतीय जनता पक्षाच्या सेवा पंधरवडा अभियानाचे प्रदेश सहसंयोजक म्हणून मला या कार्यशाळेस उपस्थित राहून मार्गदर्शन करण्याची संधी लाभली, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. आपण सर्वांनी मिळून हे अभियान जनतेच्या सेवेसाठी मोठ्या प्रमाणात यशस्वी करू, हा मला विश्वास आहे, असे आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले.

सदस्यांचा सन्मान
बैठकीत राज्य परिषद सदस्यांचा सन्मान करण्यात आला. नवीन जिल्हा पदाधिकारी व मंडल अध्यक्षांना नियुक्ती पत्र देवून सत्कार करण्यात आला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने मराठा आरक्षण संदर्भात घेतलेल्या निर्णयासाठी अभिनंदनाचा ठराव राष्ट्रीय परिषद सदस्य पोपटतात्या भोळे यांनी मांडला. या प्रसंगी महेंद्रसिंग पाटील व मा.आ.दिलीप वाघ यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी बैठकीत जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचा परिचय करून दिला. सेवा पंधरवाडा सप्ताह कार्यक्रम नियोजनाची माहिती सरचिटणीस कपिल पाटील यांनी दिली. सोशल मिडिया अॅप्पची माहिती सरचिटणीस कन्हैया रायपूरकर यांनी दिली. प्रास्ताविक सरचिटणीस अमोल पाटील यांनी केले. तर सूत्रसंचालन सरचिटणीस राजेंद्र सोनवणे यांनी केले. आभार उपाध्यक्षा मनोरमाताई पाटील यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button