
रोटरी गोल्डसिटीतर्फे व्याख्यानाचे आयोजन
जळगाव (प्रतिनिधी) : प्रत्येक आजार हा डीएनएशी संबंधित आहे आणि त्यावर उपचार देखील त्यानुसार तयार केले जाऊ शकतात, असे जेनेटिक तज्ञ डॉ. केतन वाघ यांनी प्रतिपादन केले. रोटरी क्लब ऑफ जळगाव गोल्डसिटीतर्फे गणपती नगरातील रोटरी हॉलमध्ये झालेल्या अनलॉक युवर जेनेटिक कोड या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.
व्यासपीठावर अध्यक्ष डॉ. नीरज अग्रवाल मानद सचिव स्वप्नील पलोड यांची प्रमुख उपस्थिती होती. डीएनए मध्ये आजाराची मूळ कारणे असतात. तपासणीद्वारे योग्य आहाराने देखील त्यावर उपाय शोधता येतो, असे डॉ. वाघ यांनी सांगून भविष्यात डीएनएशी संबंधित विकार टाळता येऊ शकतात असे त्यांनी सांगितले. माजी अध्यक्ष प्रशांत कोठारी यांच्या हस्ते डॉ. वाघ यांचा सत्कार करण्यात आला.आभार वेदांत मोहता यांनी मानले.




