आरोग्यजळगावताज्या बातम्याराष्ट्रीय-राज्यशासकीयशेतकरीसमस्या
रावेर तालुक्यातील बक्षिपूर येथे पाण्यामुळे संरक्षण भिंत कोसळली

जिल्हा प्रशासनाकडून पाहणी; उपाययोजना व मदत करण्याबाबत स्थानिक प्रशासनाला सूचना
जळगाव (प्रतिनिधी) : रावेर तालुक्यातील बक्षिपूर गावातील जूनी संरक्षण भिंत नागझिरी नाल्यातील पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे कोसळली. या घटनेत झालेल्या नुकसानीची पाहणी आज महसूल विभागाच्या अधिकारीवर्गाने केली.
या पाहणीसाठी निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, प्रभारी उपविभागीय अधिकारी फैजपूर निवृत्ती गायकवाड, रावेरचे तहसीलदार बंडू कापसे तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री. रावळ उपस्थित होते.
नुकसानग्रस्त भागाची माहिती घेतल्यानंतर पुढील आवश्यक ती उपाययोजना व मदत तातडीने करण्याबाबत अधिकाऱ्यांनी स्थानिक प्रशासनाला सूचना दिल्या.




