अभिवादनजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकारणराष्ट्रीय-राज्य
आत्मनिर्भर भारत संकल्प अभियानाच्या पार्श्वभूमीवर भाजपाची जिल्हा कार्यशाळा

जळगाव (प्रतिनिधी) : आत्मनिर्भर भारत संकल्प अभियानाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी पश्चिम व जळगाव जिल्हा महानगर महत्वपूर्ण संघटनात्मक आढावा बैठक उत्तर महाराष्ट्र विभागीय संघटन मंत्री रवी अनासपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव येथे पार पडली. बैठकीत रवी अनासपुरे यांनी सेवा पंधरवाडा अभियान, Next-Gen GST Reform अभियान व आत्मनिर्भर भारत अभियानाच्या अनुषंगाने आढावा घेऊन मार्गदर्शन केले.
यावेळी शहराचे आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांच्यासह महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी व पश्चिम जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, महानगर सरचिटणीस विशाल त्रिपाठी, राहुल वाघ, नितीन इंगळे, भारतीताई सोनवणे, जयेश भावसार, माजी महापौर सीमाताई भोळे यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




