जळगाव जिल्ह्यात APY, PMJJBY आणि PMSBY योजनांत उल्लेखनीय कामगिरी

जळगाव (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेच्या समन्वयाने जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये अटल पेन्शन योजना (APY), प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना (PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना (PMSBY) अंतर्गत पात्र लाभार्थ्यांची नोंदणी, नविन सदस्य नोंदणी आणि नुतनीकरणाच्या कामात उल्लेखनीय प्रगती झालेली आहे.
जिल्ह्यात एकूण २,०९,५२२ सदस्य APY, २,३४,८१६ सदस्य PMJJBY आणि ३,१४,०८८ सदस्य PMSBY योजनेकरिता पात्र म्हणून नोंदवले गेले आहेत. त्यामधून पुढील प्रमाणे नविन नोंदणी झाली आहे:
🔹 APY (अटल पेन्शन योजना):
नवीन नोंदणी – १२,८१५
नुतनीकरण (Renewal) – १५४
एकूण प्रगती – १२,९६९
🔹 PMJJBY (जीवन बीमा योजना):
नवीन नोंदणी – ३१,४०८
नुतनीकरण – ८२२३
एकूण प्रगती – ३९,६३१
🔹 PMSBY (सुरक्षा बीमा योजना):
नवीन नोंदणी – ३७,४६१
नुतनीकरण – १४,५०६४
एकूण प्रगती – १,८९,५२५
या योजनांच्या अंमलबजावणीत यावल, रावेर, भडगाव, पाचोरा व जामनेर या तालुक्यांनी विशेषतः उत्तम कामगिरी बजावली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पंचायत समित्यांनी एकत्रित प्रयत्न करून ही योजना प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचवली.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लोकसंख्येला सामाजिक सुरक्षा कवच देण्यासाठी शासनाच्या या योजनांचे सशक्त माध्यम म्हणून उपयोग होतो आहे. भविष्यातही या योजनांच्या व्यापक प्रसारासाठी जनजागृती आणि नियमित नुतनीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे.