जळगावताज्या बातम्याशैक्षणिकसामाजिक

स्व.भाईसाहेब निकम यांच्या पुण्यस्मरणानिमित्त चोपड्यात विविध कार्यक्रम

शिष्यवृत्ती वाटप, वृक्षारोपण करून श्रद्धांजली अर्पण

चोपडा (प्रतिनिधी) : गुळीनदी परिसर शिक्षण प्रसारक मंडळ रुखणखेडे प्र. चोपडा ता. चोपडा यांच्या वतीने संस्थेचे संस्थापक चेअरमन स्व. भाईसाहेब दिलीप देवराव निकम यांच्या ६ व्या पुण्यस्मरणानिमित्त रविवारी सकाळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संस्था संचलित आईसाहेब चिंधाबाई निंबाजी पाटील माध्यमिक विद्यालय, माचले येथे झालेल्या या कार्यक्रमात श्रद्धांजली अर्पण, गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरण आणि वृक्षारोपण अशा उपक्रमांनी परिसर भारावून गेला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शैलजाताई निकम, संस्थेचे अध्यक्ष प्रविण निकम, उपाध्यक्ष जगन्नाथ पाटील, सचिव घनःश्याम पाटील, रितेश निकम, अमर देशमुख यांसह जगन पाटील, आत्माराम पाटील, चंद्रशेखर पाटील, शेखर पाटील, नितीन पाटील, गुलाबराव पाटील, तुळशीराम पाटील, संतोष पाटील, चंद्रशेखर पाटील, नरेंद्र पाटील, अरूण पाटील, रमेश पाटील, युवराज पाटील, मोहन पाटील, ताराचंद पाटील, बालकृष्ण पाटील, अॅड. मधुकर पाटील, रतिलाल पाटील, श्रीराम कोळी, सतीष पाटील, सुखदेव पाटील, भागवत पाटील, अंकुश मालचे, मोतीलाल भाऊ आदींसह सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्व. भाईसाहेब यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ महाराष्ट्र राज्य पणन महासंघाचे उपाध्यक्ष व दूध संघाचे संचालक रोहित निकम आणि परिवाराच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून स्व. भाईसाहेबांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि प्रेरणादायी कार्याचा उल्लेख करत त्यांच्या सोबतच्या संस्मरणीय आठवणी उपस्थितांसमोर मांडल्या. शैलजा निकम यांनी यावेळी नुकतेच राज्यसभा खासदार झालेले पद्मश्री अॅड. उज्ज्वल निकम यांच्यावर स्व. भाईसाहेबांनी लिहिलेला लेख सादर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी “आईवडिलांचे उपकार विसरू नका” या विषयावर प्रभावी कविता सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक वसंत पाटील यांनी केले.

गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
यावेळी दहावीतील निकिता भिल (८३.४०%), दिपाली रूपवते (८२.८०%), यामिनी पाटील (८२%), नववीतील साधना सांगोळे (७७.६७%), दिक्षा शिंदे (७७%), हर्षदा बाविस्कर (७३.६७%), आठवीतील साक्षी पाटील (९०.३३%), तनुजा कोळी (८८.७७%), कल्याणी ठाकूर (८६%), सातवीतील राजहंस साळुंखे (८२.४४%), रूपाली सांगोळे (८२.२२%), बादल बिल (८१.५६%), सहावीतील गायत्री पाटील (८७.६१%), आराध्या भिल (८४.५%), वैभवी कोळी (७९.७८%) तर पाचवीतील आरती रूपवते (८६.५६%), दिव्या भिल (८२.३१%), पूजा बिल (८१.१३%) या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button