महिला बचत गटाच्या स्टॉलच्या प्रदर्शनास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सेवा पंधरवाडा अभियान अंतर्गत ‘व्होकल फॉर लोकल’ जनजागृती उपक्रम
जळगाव (प्रतिनिधी) : स्वदेशी वस्तू तयार करून विकणाऱ्या स्थानिक महिला बचत गटाच्या महिलांच्या स्टॉलच्या प्रदर्शनाचे आयोजन मनपात करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने स्वदेशी वस्तू तयार करून विकणाऱ्या स्थानिक महिला बचत गटाच्या महिलांच्या स्टॉलचे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी विविध स्वदेशी वस्तू महिलांनी सादर केल्या. या स्टॉलला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सेवा पंधरवाडा अभियानाअंतर्गत ‘व्होकल फॉर लोकल’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भाजप जळगाव जिल्हा महानगर व जळगाव शहर महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने शहरातील ७५ महिला बचत गटाच्या महिलांचा सन्मान शहराचे आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांच्यासह महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी व महापालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी महानगर सरचिटणीस विशाल त्रिपाठी, सेवा पंधरवाडा अभियान संयोजक विजय वानखेडे, ‘व्होकल फॉर लोकल’ अभियान संयोजक संतोष इंगळे, दीपक परदेशी, भूषण लाडवंजारी, सुनील सरोदे, क्षितिज भालेराव यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते व बचत गटाच्या महिला उपस्थित होते.




