
रावेर (प्रतिनिधी) : येथील मॅक्रो व्हिजन अकॅडमी येथे शनिवार, २ ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांमध्ये मैदानी खेळांचे महत्त्व पटवून देण्यासाठी “टग ऑफ वॉर” (रस्सीखेच) या पारंपारिक खेळाचे आयोजन शौर्य, अग्नी, पृथ्वी, धनुष या विविध हौसेसच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात करण्यात आले.
यावेळी विद्यार्थी, शिक्षक, पालक व कर्मचाऱ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सर्व सहभागींचा जोश, टीम स्पिरीट आणि खेळात एकमेकांना दिलेले सहकार्य यामुळे संपूर्ण मैदानात ऊर्जा आणि आनंदाची लाट पसरली होती.
शाळेचे व्यवस्थापक किरण दुबे तसेच मुख्याध्यापक जनार्दन धनगर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, खेळात जिंकणे किंवा हरणे हे गौण आहे, पण सहभाग घेणे हेच खरे यश आहे. तसेच, खेळामुळे शरीर तंदुरुस्त राहते आणि मन प्रसन्न होते. यामुळे अशा मैदानी खेळांचा नियमित सराव करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
हा खेळ आणि सहभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये टीमवर्क, सहकार्य, संयम व खेळातील शिस्त या गुणांचा विकास झाला. यशस्वीतेसाठी शाळेच्या क्रीडा विभागामार्फत सहकार्य करण्यात आले. शाळेचे चेअरमन श्रीराम पाटील, सेक्रेटरी स्वप्नील पाटील, जॉइंट सेक्रेटरी प्रमोद पाटील, शाळेच्या शैक्षणिक संचालिका वनिता पाटील यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे कौतुक व आनंद व्यक्त केला आहे. तसेच शाळेचे उपाध्यक्ष ऍड. प्रवीण पासपोहे, खजिनदार विजय गोटीवांले, डायरेक्टर धनराज चौधरी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.