
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहरात संजय गांधी निराधार योजनेचे उत्कृष्ट कामाबद्दल ग्राम महसूल अधिकारी नितीन किशोर पाटील यांचा पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
महसूल दिनाचे औचित्य साधत १ ऑगस्ट रोजी झालेल्या या कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार संजय सावकारे यांच्यासह जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल उपस्थित होत्या. या त्यांच्या कार्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.