
रावेर (प्रतिनिधी) : येथील स्वामी प्रि-प्रायमरी आणि समृद्धी इंग्लिश मिडीयम स्कूल, केऱ्हाळा बु! येथे गुरुवार ३१ जुलै रोजी रंगभरणे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत इयत्ता नर्सरी ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना देण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. प्रत्येक विद्यार्थ्यांना चित्रकाढलेला पेपर देण्यात आला. ज्यावर त्यांनी आपली कल्पकता वापरून रंगभरण केले. विविध रंगांच्या छटांनी रंगवलेली चित्रे पाहुन शिक्षक भारावून गेले होते.
स्पर्धेचे परीक्षण वर्गशिक्षकांनी केले. प्रत्येक वर्गातून तीन क्रमांक काढण्यात आला. त्यातील विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देण्यात येऊन त्यांचे कौतुक करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन विभाग प्रमुख जॉन्सी थॉमस यांनी केले. कलेचे शिक्षक प्रि-प्रायमरीचे अर्चना महाजन व प्रायमरीचे वैशाली पाटील यांनी केले. सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.