जळगावयोजनारोजगारशासकीय

स्पर्धा परीक्षा तयारीसाठी अनुसूचित जमातीतील उमेदवारांना मोफत प्रशिक्षण मुलाखत

२९ जुलै रोजी रावेर येथे प्रशिक्षण, ऑनलाईन नोंदणी आवश्यक

जळगाव (प्रतिनिधी) : अनुसूचित जमातीतील (एस.टी.) युवक-युवतींसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, रावेर यांच्या वतीने अनुसूचित जमातीतील उमेदवारांसाठी स्पर्धा परीक्षा पूर्व तयारीसाठी मोफत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हे प्रशिक्षण १ ऑगस्टपासून सुरू होऊन १५ नोव्हेंबर २०२५ पर्यंत राबवण्यात येणार आहे.

हा प्रशिक्षण कार्यक्रम ३ महिने १५ दिवसांचा असून, यामध्ये उमेदवारांना गणित, बुद्धिमत्ता चाचणी, सामान्य ज्ञान, इंग्रजी व मुलाखत तंत्र या विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शकांद्वारे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणासाठी पात्र उमेदवारांची मुलाखत २९ जुलै रोजी सकाळी १० वाजता रावेर येथे घेण्यात येणार आहे.

या प्रशिक्षणाकरिता उमेदवार अनुसूचित जमातीचा असावा (जातीचा दाखला आवश्यक), महाराष्ट्राचा रहिवासी असावा, किमान १०वी उत्तीर्ण असावा, वय १८ वर्षे पूर्ण असावे. प्रशिक्षण कालावधीत उमेदवारांना दरमहा १००० रुपये विद्यावेतन, तसेच प्रशिक्षण पूर्ण केल्यावर चार पुस्तकांचा मोफत संच व प्रमाणपत्र देण्यात येईल. मात्र, उमेदवारांनी स्वतःच्या राहण्याची व भोजनाची व्यवस्था करावी लागेल.

प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नोंदणी https://rojgar.mahaswayam.gov.in या शासकीय पोर्टलवर करणे आवश्यक आहे. मुलाखतीच्या दिवशी उमेदवारांनी पुढील कागदपत्रे मूळ व झेरॉक्स प्रतीसह सादर करावीत यात शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक गुणपत्रिका (१०वी, १२वी, पदवी), आधार कार्ड, बँक पासबुक, दोन पासपोर्ट साईज फोटो आणि अनुसूचित जमातीचा जातीचा दाखला. ही कागदपत्रे आवश्यक आहेत.

अधिक माहितीसाठी कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, प्लॉट नं. २, शनि मंदिर मागे, स्टेशन रोड, पंचायत समिती जवळ, रावेर. दूरध्वनी क्रमांक: ०२५८४-२५१९०६ यावर संपर्क साधावा असे व प्रशिक्षणात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button