जळगावआरोग्यआर्थिकक्राईमताज्या बातम्याशासकीयसमस्या

एमआयडीसी परिसरातील व्यापारी संकुलामधील ७ दुकानांत चोरी !

लाखोंचा ऐवज लंपास; गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी) : एमआयडीसी परिसरातील व्यापारी संकुलातील ७ दुकानांचे शटर उचकटवून अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल आणि रोकड लांबविल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. एमआयडीसी सारख्या गजबजलेल्या ठिकाणी अशा प्रकारे चोरीच्या घटना घडल्याने व्यापारी वर्गात आणि उद्योजकांमध्ये देखील खळबळ उडाली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

काशिनाथ लॉज मागे असणाऱ्या एमआयडीसीतील गुरांचा बाजार येथे बी सेक्टर मध्ये ७ दुकानांचे शटर उचकटवून अज्ञात चोरट्यांनी दुकानांमधून रोकड आणि मुद्देमाल लंपास केल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली असून व्यापाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाले आहे. दरम्यान घटनेची माहिती कळताच एमआयडीसीचे पोलीस उपविभागीय अधिकारी नितीन गणापुरे, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. नेमका मुद्देमाल किती गेला आहे, याची माहिती अद्याप समोर आली नसून मात्र लाखो रुपयांची रोकड सह मुद्देमाल चोरटयांनी लांबविल्याचा अंदाज आहे. उशिरापर्यंत एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button