
जळगाव (प्रतिनिधी) : येथील रोटरी क्लब जळगाव तर्फे गणपती नगरातील रोटरी हॉल येथे आयोजित स्नेह मिलन कार्यक्रमात अनुभव व गीतांद्वारे दिवाळीचे विविध सकारात्मक पैलू उलगडले गेले. कार्यक्रमास आ. राजूमामा भोळे, जळगाव रेल्वे स्टेशनचे अधीक्षक कौस्तुभ चौधरी, गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी अध्यक्ष गिरीश कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात भूमिका स्पष्ट केली. कॅप्टन मोहन कुलकर्णी यांनी बासरीवर गणेश वंदना सादर केली. ॲड. कीर्ती पाटील यांनी आली माझ्या घरी ही दिवाळी तर आदिती कुलकर्णी यांनी नवीन हे वर्ष सुखाचे जावो ही गाणी सादर केली. विशाखा पोतदार यांनी दीपावली मनाई सुहानी हे गीत सादर केले.
सहप्रांतपाल डॉ. अपर्णा भट – कासार, संजय गांधी, केदारनाथ मुंदडा, सरिता खाचणे, रजनीश लाहोटी यांनी दिवाळी बद्दलचे सकारात्मक अनुभव व आठवणी मनोगतात सांगितल्या. आभार मानद सचिव सुभाष अमळनेरकर यांनी मानले. रोटरी सेवा कार्याच्या ३६ सामाजिक संदेशांचे स्टिकर आणि शुभेच्छा पत्र व गुलाबपुष्प देऊन संवाद सचिव पंकज व्यवहारे यांनी प्रत्येकाचे स्वागत केले.
कार्यक्रमास अनेक क्षेत्रातील मान्यवर, शहरातील सर्व रोटरी क्लबचे अध्यक्ष – सचिव आणि रोटरी डिस्ट्रिक्ट ऑफिसर्स तसेच रोटरी क्लब जळगावच्या सदस्यांची परिवारासह मोठ्या संख्येने उपस्थिती होती. रोटरीचे प्रांगण फुलांच्या आकर्षक रांगोळी व पणत्यांनी सुशोभित करण्यात आले होते. मान्यवरांच्या हस्ते तेजाचा प्रकाश पसरविणाऱ्या आतषबाजीने समारोप करण्यात आला.




