आंदोलनजळगाव

भीम आर्मीचे फैजपूर प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

“आपला दवाखाना” घोटाळा प्रकरणी एस.आय.टी.चौकशी करण्याची मागणी

फैजपूर (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यातील हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आणि वर्धनी केंद्र शहरी आरोग्य योजना यामध्ये झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात शुक्रवारी भीम आर्मी भारत एकता मिशनतर्फे फैजपूर प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करून एस.आय.टी. (विशेष तपास पथक) मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

निवेदनात म्हटले आले की, १५व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून प्राप्त झालेला निधी जनतेच्या आरोग्यासाठी वापरण्याऐवजी अपहार करण्यात आला असून, यामागे डॉ. भायेकर यांची भूमिका संशयास्पद आहे. पत्रकार परिषदेमध्येही या घोटाळ्याचा सविस्तर तपशील उघड करण्यात आला होता. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, याकडे भीम आर्मीने प्रशासनाचे लक्ष वेधले.

आंदोलनाचा इशारा
१४ ऑगस्टपर्यंत कारवाई झाली नाही, तर १५ ऑगस्ट रोजी भीम आर्मीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत तीव्र आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनादरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील, असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनदेतेवेळी भीम आर्मीचे रावेर तालुकाध्यक्ष राहुल निंभोरे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख राहुल जयकर, तालुका उपाध्यक्ष जुम्मा तडवी, जिल्हा संघटक हेमराज तायडे, संतोष तायडे, अविनाश लहासे व मुकद्दर तडवी, मोसिम तडवी आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button