पुन्हा निघाले ‘एसी’ बाहेर….

फैजपूर न.प.चे माजी नगराध्यक्ष निलेश राणे (पिंटू राणे) यांचा शासनावर संताप
जिल्हा परिषदच्या अनेक अधिकाऱ्यांच्या दालनात नियमबाह्य वातानुकूलित यंत्र
जळगाव (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद जळगावच्या दोन्ही ईमारतीमध्ये अनेक अधिकाऱ्यांच्या दालनात नियमबाह्य वातानुकूलित यंत्र (एसी) बसविण्यात आले आहेत. वास्ताविक शासनाच्या नियमानुसार अधिकाऱ्यांनी जनतेच्या पैशाचा विनीयोग चांगल्या कामासाठी करावयाचा असतो. मात्र कुंपणच शेत खातंय अशी अवस्था जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांची झाली आहे.
तीन वर्षांपूर्वी जळगामधीलच एका माहिती अधिकार कार्यकत्याने अशी माहिती घेेवून बऱ्याच अधिकाऱ्यांचे एसी काढायला भाग पाडले होते. आता पुन्हा फैजपूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष निलेश राणे (पिंटू राणे) यांनी जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व कार्यकारी अभियंता यांच्या दालनात भेट दिली असता दोन्ही दालनात वातानुकुलीत यंत्रे सुरु असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या तर ॲन्टी चेंबरमध्ये टेबल खुर्च्या थंड होत होत्या. या जनतेच्या पैशाचा अपव्यव बधून निलेश राणे यांच्यातील माणूस जागा होवून त्यांनी तेथील चित्रिकरण करुन संताप व्यक्त केला. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी उत्तर देण्याचे टाळले.
एकीकडे हलकासा पाऊस झाला तरी विजेचे संकट शहरात निर्माण होते. ग्रामीण भागात तर एकदा गूल झालेली विज कधी परत येईल, याची शाश्वती नसते. वीजेअभावी शेतकऱ्यांना, पिकांना पाणी देणे कठीण झालेले असतांना पिण्याच्या पाण्याचे संकटही सामान्य नागरिकांना सहन करावे लागते तर जनतेच्या पैशावर ज्यांचे पगार सुरु आहेत तेच थंडगार हवेत बसून विजेची नासाडी करतांना दिसत आहेत.
नियम काय म्हणतो
सरकारी अधिकाऱ्यांच्या दालनात एसी बसविण्याबाबत राज्य सरकारने 25 मे 2022 रोजीच्या परिपत्रकात नियम निश्चित केलेलेे आहेत. त्यानुसार सातव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणीत एस 30 पेक्षा कमी असलेल्या अधिकाऱ्यांच्या दालनात वातानुकुलीत यंत्रांना परवानगी नसते. असे असतांनाही “या” अधिकाऱ्यांच्या दालनात एसी कसे? होणाऱ्या विद्युत अपव्ययाचे काय ? मुख्य कार्यकारी अधिकारी या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करतील काय ?
श्री पिंटू राणे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना प्रश्न
* परिपत्रकानुसार शासकीय अधिकाऱ्यांच्या दालनात वातानुकुलीत यंत्रे बसविण्यात आली आहेत का?
* वातानुकुलीत यंत्रांवर दालनाचे नाव टाकले आहे म्हणजेच परवानगी घेवून – देवूनच वातानुकुलीत यंत्रे बसविण्यात आले का ?
* विजेचा अपव्यय अधिकारी करत आहेत त्यांच्यावर काय कार्यवाही करणार त्यांना लाईट बीलाची रक्कम दंड म्हणून करणार का?
*सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांप्रमाणे जळगाव जिल्हाधिकारी सुद्धा एसी प्रकरणावर निर्णय घेतील काय?