आरोग्यजळगावताज्या बातम्याशालेयशैक्षणिक

मॅक्रो व्हिजन स्कूल, रावेर येथे “हेल्दी बर्थडे” उपक्रमाचे कौतुक

रावेर (प्रतिनिधी): रावेर येथील मॅक्रो व्हिजन स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून “हेल्दी बर्थडे” हा अभिनव उपक्रम राबवण्यात येत असून, या उपक्रमाचे शैक्षणिक व सामाजिक स्तरावर सर्वत्र कौतुक होत आहे.

यापूर्वी वाढदिवसानिमित्त चॉकलेट्स वाटण्यात येत असत. मात्र अतिसाखरेमुळे मुलांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन शाळेने सकारात्मक बदल स्वीकारला आहे. आता वाढदिवसानिमित्त शेंगदाण्याची व तिळाची चिक्की यांसारखे पौष्टिक पदार्थ किंवा पेनसारख्या उपयोगी शैक्षणिक वस्तू वाटण्यात येत आहेत.

हा आरोग्यदायी उपक्रम शाळेच्या शैक्षणिक संचालिका वनिता पाटील यांच्या संकल्पनेतून साकार झाला असून, इयत्ता सहावीतील विद्यार्थिनी श्रुती इंगळे हिच्या पालकांच्या सहकार्याने उपक्रमाची यशस्वी सुरुवात झाली.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण होत असून पालकवर्गाकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. शाळेचे व्यवस्थापक किरणजी दुबे यांनी हा उपक्रम इतर शाळांसाठीही प्रेरणादायी असल्याचे सांगितले. मुख्याध्यापक श्री. जनार्दन धनगर यांनी उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत समाधान व्यक्त केले.

शाळेचे चेअरमन श्रीराम पाटील, सेक्रेटरी स्वप्नील पाटील, जॉइंट सेक्रेटरी प्रमोद पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button