आरोग्यउपचारजळगावताज्या बातम्या

मेंदूज्वरग्रस्त दीड वर्षीय चिमुकलीवर यशस्वी उपचार

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञांचे उल्लेखनीय कार्य

जळगाव (प्रतिनिधी): मुक्ताईनगर तालुक्यातील दीड वर्षीय चिमुकलीवर मेंदूज्वर या गंभीर आजारावर जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी उपचार करण्यात आले. अचानक तीव्र ताप व झटके आल्याने कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले.

बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. अनंत बेंडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने तपासण्या करून मेंदूज्वराचे निदान केले. चिमुकलीला बालरोग अतिदक्षता विभागात दाखल करून २४ तास निरीक्षणाखाली औषधोपचार सुरू करण्यात आले. अवघ्या आठवडाभरात तिच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली.

उपचार पूर्ण झाल्यानंतर चिमुकलीला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. कुटुंबीयांनी डॉक्टर व नर्सिंग स्टाफचे आभार मानले.
निवासी डॉक्टर, डॉ. उल्हास पाटील रुग्णालय, जळगाव

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button