अभिवादनआरोग्यआर्थिकजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रयोजनाराष्ट्रीय-राज्यरोजगारशेतकरीशैक्षणिकसामाजिक

प्रगतिशील महाराष्ट्र २०२५ च्या भव्य प्रदर्शनाचे आज होणार उद्घाटन

विनामूल्य प्रदर्शनास नागरिकांनी उपस्थित राहण्याचे खासदार स्मिताताई वाघ यांचे आवाहन

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिताताई वाघ यांच्या संकल्पनेतून केंद्र व राज्य सरकारच्या योजना व उपक्रमांच्या प्रगतिशील महाराष्ट्र २०२५ भव्य प्रदर्शन ३, ४ आणि ५ नोव्हेंबरपासून शिवतीर्थ, (जी एस ग्राउंड) जळगाव येथे आयोजित करण्यात आले आहे. या भव्य प्रदर्शनीचे उद्घाटन आज सोमवार, दि. 3 नोव्हेंबर रोजी सकाळी १०:३० वाजता महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीशभाऊ महाजन, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

याप्रसंगी केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे, राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खासदार अँड. उज्वल निकम, आ. अनिल पाटील, आ. सुरेश भोळे (राजू मामा), आ. मंगेश दादा चव्हाण, आ. किशोर अप्पा पाटील, आ. अमोल पाटील, आ. प्रा. चंद्रकांतदादा सोनवणे, आ. अमोलदादा जावळे, आ. चंद्रकांत पाटील, भाजपा जिल्हा अध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी (पश्चिम), चंद्रकांत बाविस्कर (पुर्व) व दिपक सूर्यवंशी (जिल्हा महानगर) तसेच पदाधिकारी व केंद्र/राज्य शासनाचे अधिकारी उपस्थित राहणार आहे.

प्रदर्शनात ५४ विविध प्रकारचे शासकीय योजनांचे स्टॉल

भव्य प्रदर्शनास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, आहे आवाहन खासदार स्मिताताई वाघ यांच्या वतीने करण्यात आले आहे. या प्रदर्शनाची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ५ .३० वाजेपर्यंत आहे. विनामूल्य प्रवेश असुन या प्रदर्शनामध्ये ५४ विविध प्रकारचे शासकीय योजनांचे स्टॉल लावण्यात आले आहे. यामध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, वित्त, बँकिंग, विमा, आरोग्य कल्याण , कृषी, फलोत्पादन, हातमाग, हस्तकला, अंतराळ, विज्ञान, अणुऊर्जा, वाणिज्य, व्यापार, पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकास, कृषी, पशुसंवर्धन, गृहनिर्माण व शहर विकास अशा विविध प्रकारच्या माहिती या ठिकाणी दिल्या जाणार आहेत. तरी जळगाव जिल्हा लोकसभा क्षेत्रातील सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, अशी विनंती आयोजकांच्या वतीने करण्यात आलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button