जळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराष्ट्रीय-राज्यसामाजिक

जळगावात सुवर्णकार समाजाच्या ‘ऋणानुबंध’ मेळाव्यात १५०० वधू-वरांची नोंदणी!

जुळणार ७० हुन अधिक रेशीमगाठी; ४८० जणांनी दिला प्रत्यक्ष परिचय

जळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र सुवर्णकार सेनेतर्फे आयोजित १० व्या अखिल भारतीय सर्व पोटशाखिय वधू-वर परिचय मेळाव्याला मोठा प्रतिसाद मिळाला. आदित्य लॉन येथील कै. विजय बुधाशेठ बिरारी सभागृहात हा सोहळा पार पडला. या मेळाव्यात एकूण १५०० उमेदवारांची (४०० वधू आणि ११०० वर) नोंदणी झाली, त्यापैकी ४८० जणांनी प्रत्यक्ष परिचय दिला. या उपक्रमातून सुमारे ७० विवाह जुळण्याच्या मार्गावर असून, सुवर्णकार समाजातील विविध पोटशाखांना एकत्र आणण्यासाठी हा मेळावा यशस्वी ठरला.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे आमदार राजूमामा भोळे, व्यवसायिक सुनील मंत्री, माजी आमदार जयप्रकाश बावीस्कर तसेच जळगाव मनपाच्या नवनिर्वाचित नगरसेविका रंजनाताई वानखेडे, गौरव बिरारी, यश विसपुते, नितीन सोनार, पौर्णिमा देवरे, रमेश वाघ, शरदचंद्र रणधीर आदी उपस्थित होते.

प्रसंगी जिल्हा अध्यक्ष संजय विसपुते, जिल्हा उपाध्यक्ष विजय वानखेडे, जिल्हा सचिव संजय पगार, स्वागताध्यक्ष रमेश वाघ, मेळावा प्रमुख सुभाष सोनार, मेळावा उप प्रमुख नितीन गंगापुरकर, नियोजय सामिती प्रमुख शरदचंद्र रणधीर, मेळावा सचिव प्रशांत विसपुते, मेळावा सह सचिव दिलीप पिंगळे, प्रसिद्धी प्रमुख गोकुळ सोनार यांच्या हस्ते श्री नरहरी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. तसेच ऋणानुबंध वधु वर पालक परिचय पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

प्रास्ताविकात संजय विसपुते यांनी वधू-वर मेळावा ही काळाची गरज असल्याचे सांगत, पालकांनी अवास्तव अपेक्षा न ठेवता सुवर्ण कारागिरांचा विचार करावा, असे आवाहन केले. “विवाह हा केवळ दोन मनांचे मिलन नसून तो एक संस्कार आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले. यंदा प्रथमच पालकांसाठी ‘प्रत्यक्ष परिचय’ सत्राचे विशेष नियोजन करण्यात आले होते, ज्याला मोठा प्रतिसाद मिळाला. या मेळाव्याच्या माध्यमातून सुमारे ७० विवाह जुळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मेळाव्या करिता कुठलेही प्रवेश शुल्क न घेता वाजवी दरात वधु वर परिचय पुस्तिका देण्यात आली. तसेच उपस्थित परिचय करून देणाऱ्या मुलींना पुस्तक व चटई भेट म्हणून उपलब्ध करून देण्यात आली. मेळाव्यास महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजराथ येथून हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या समाज बांधवांसह अनेक मुलामुलींनी परिचय करून दिला. मेळाव्याचे सूत्रसंचलन राजश्री पगार, रतनकुमार थोरात, संजय दुसाने, केतन सोनार यांनी केले.

यशस्वीतेसाठी संजय पगार, मेळावा सचिव प्रशांत विसपुते, मेळावा समिती, महाराष्ट्र सुवर्णकार सेनेचे पदाधिकारी, ऋणानुबंध मेळावा पदाधिकारी, सहयोगी सदस्य, सुवर्णकार महिला मंडळ आदींनी परिश्रम घेतले. आभार संजय पगार यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button