आरोग्यकलाकारजळगावताज्या बातम्यानिवडपुरस्कारशैक्षणिक

रोटरी वेस्टच्या किल्ले बनवा स्पर्धेत शानबाग विद्यालय,राजे संभाजी ग्रुप प्रथम

जळगाव (प्रतिनिधी) : येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टतर्फे आयोजित शिवदुर्ग महोत्सव पर्व १ मध्ये किल्ले बनवा स्पर्धेत शालेय गटात ब. गो. शानबाग विद्यालयाने तर खुल्या गटात राजे संभाजी ग्रुपने प्रथम क्रमांक मिळवीत विजेते प्राप्त केले. मायादेवी नगरातील रोटरी भवन मध्ये स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता.

याप्रसंगी रायगड प्राधिकरणाचे वास्तू विशारद वरूण भामरे, माजी अध्यक्ष नितीन रेदासनी, अध्यक्ष गौरव सफळे, सचिव देवेश कोठारी, प्रकल्प संकल्पना तुषार तोतला यांची प्रमुख उपस्थिती होती. शालेय समूह गटात द्वितीय क्रमांक रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूल तर तृतीय क्रमांक संस्कृती माध्यमिक विद्यालय यांनी मिळविला.

उत्तेजनार्थ पारितोषिक रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूलच्या गट क्रमांक ६ ला देण्यात आले. खुल्या गटात रायगड किल्ला साकारणाऱ्या गट क्रमांक तीनला द्वितीय पारितोषिक तर राजेशाही ग्रुपला तृतीय पारितोषिक मिळाले. सर्व विजेत्यांना रोख पारितोषिके व प्रशस्ती पत्र प्रदान करून गौरविण्यात आले. सहभागी सर्व स्पर्धकांना देखील प्रशस्तीपत्र देण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण महेश पवार संतोष पाटील व डॉ. रणजीत चव्हाण यांनी केले.

या संपूर्ण स्पर्धेच्या साहित्यासाठी व सर्व पारितोषिकांसाठी प्रकल्प प्रमुख अभियंता राहुल पवार यांचे सहकार्य लाभले.प्रास्ताविक तुषार तोतला यांनी तर सूत्रसंचालन माजी अध्यक्ष सरिता खाचणे यांनी केले. कार्यक्रमास रोटरी वेस्टचे चंद्रकांत सतरा, डॉ.सुशीलकुमार राणे, विनीत जोशी, योगेश राका, प्रा. डॉ. चेतन महाजन या मान्यवरांसह पालक शिक्षक व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button