
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कारवाई, उपविभागीय दंडाधिकारी यांचे आदेश
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यात आगामी नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्यातील पाच जणांना जिल्ह्यातून सहा महिन्याकरिता तडीपार करण्यात आले आहे. हे आदेश उपविभागीय दंडाधिकारी, जळगाव यांनी दिले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचोरा उपविभागातील जामनेर व पहूर पोलीस स्टेशन हद्दीतील कैलास गायकवाड, रामकृष्ण भिल, तेजराव गेठे व गौरव गेठे यांच्या गुन्हेगारी कृत्यामुळे हद्दपार प्रस्ताव तयार करून पोलीस अधीक्षक यांच्या मार्फत उपविभागीय दंडाधिकारी, जळगाव यांच्याकडे सादर करण्यात आला होता. याबाबत चौकशी होऊन जिल्ह्यात गंभीर स्वरूपातील गुन्हे होण्याची शक्यता नाकारता येत नाही यामुळे पास जणांना तडीपार करण्याचे आदेश पारित करण्यात आले.
यांच्यावर झाली कारवाई
जामनेर पोलीस स्टेशन हद्दीतील कैलास रामलाल गायकवाड (रा.सामरोद ता. जामनेर जि. जळगाव), रामकृष्ण सोनु भिल (रा. गारखेडा ता. जामनेर जि. जळगाव) तर पहूर पोलीस स्टेशन हद्दीतील तेजराव पंढरी गेठे व गौरव तेजराव गेठे (दोन्ही रा. गोंदेगाव, ता. जामनेर जि. जळगाव) आणि जळगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीतील अजिज खान बाबुखान मुलतानी (पठाण) (रा. गेंदालाल मिल जळगाव) यांच्यावर ६ महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक चाळीसगाव कविता नेरकर (पवार) यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी, पाचोरा उपविभाग बापु रोहोम तसेच जामनेरचे पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार, पहुर पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक प्रमोद कटोरे यांनी कार्यवाही केली आहे.




