सरदार वलभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त उद्या एकता दौड

जळगाव (प्रतिनिधी) : ‘एक भारत, अखंड भारताचे शिल्पकार लोहपुष सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या १५० व्या जयंती निमित्त भारतीय जनता पार्टी कडून एकता दौडचे आयोजन करण्यात आले आहे. जळगाव महानगर पालिका सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यापासून शुक्रवार] ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता या दौडचे सुरवात होणार आहे.
महानगर पालिकेपासून सुरुवात झालेली दौड टॉवर चौक, चित्रा चौक, बेंडाळे चौक, बी.जे. मार्केट, पांडे चौक, बीएसएनएल कार्यालय या मार्गाने येऊन सरदार वल्लभभाई पटेल स्मारक सभागृह येथे समारोप होईल.
तरी भाजपा जळगाव जिल्हा महानगरचे आमदार, खासदार सर्व प्रदेश पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, जिल्हा मोर्चा/ आघाडी, प्रकोष्ट पदाधिकारी, माजी नगरसेवक, मंडल अध्यक्ष, मंडल पदाधिकारी, शक्ती केंद्रप्रमुख, बूथ प्रमुख यांच्यासह सर्वपण अधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे करण्यात आले आहे.




