आरोग्यअभिवादनक्राईमजळगावताज्या बातम्यापुरस्कारमहाराष्ट्रराष्ट्रीय-राज्यशासकीय

श्वान “हॅप्पी” पोलीस दलातून सेवानिवृत्ती!

नवीन “शौर्य”चा श्वान पथकात दाखल

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेल्या श्वान “हॅप्पी” आज सेवानिवृत्त झाला. तर एक नवीन श्वान बेल्जिअम मेलिनॉइस जातीचा गुन्हे शोधक कामाकरीता उत्कृष्ठ श्वान “शौर्य” हा श्वान पथकात दाखल झाला आहे.

हे दोन्ही कार्यक्रम आज पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक (गृह) अरुण आव्हाड, राखीव पोलीस निरीक्षक सुगरवार तसेच श्वान पथक व BDDS प्रभारी अधिकारी पो. उपनि. देविदास वाघ यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी श्वान पथकातील पोहेकॉ संदीप परदेशी, मनोज पाटील, निलेश झोपे, पोना प्रशांत कंकरे उपस्थित होते.

महत्त्वपूर्ण योगदान

श्वान हॅप्पी यांचा जन्म दि. 05/06/2015 रोजी झाला आहे. तसेच त्यांचे 9 महिन्यांचे प्रशिक्षण पुणे येथील गुन्हे अन्वेषण विभागात (CID Pune) पार पडलेले आहे. तो जळगाव जिल्हा पोलीस दलात दिनांक 01/08/2015 पासून कार्यरत होता व त्याने आजपर्यंत अनेक गुन्हे उघडकीस आणले असून तसेच विविध गुन्ह्यांमधील आरोपींचा शोध घेण्यास व आरोपींचा मार्ग काढणे कामी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

श्वान हॅप्पीने उघडकीस आणलेले गुन्हे
1) मुक्ताईनगर पोलीस स्टेशन (2016) : गु.र. नं.: 198/16, कलम 427, 897, 34 भादंवि
2) रामानंद पोलीस स्टेशन (2018) : गु.र. नं.: 95/18, कलम 363, 302, 201 भादंवि
3) यावल पोलीस स्टेशन (2019), गु.र. नं.: 124/2019, कलम 302 भादंवि
4) सावदा पोलीस स्टेशन (2020), गु.र. नं.: 35/2020, कलम 302 भादंवि

उल्लेखनीय कामगिरी

तसेच 62 वा अखिल भारतीय कर्तव्य मेळावा 2018 (लखनौ, उत्तर प्रदेश) मध्ये all India 5 वे स्थान मिळवुन महाराष्ट्र राज्याला चॅम्पियनशिप मिळवण्यामध्ये मोलाचा वाटा उचलला होता. म्हणुन श्वान हॅप्पी व नेमणुकीस असलेले पोलीस अंमलदार पोहेकॉ संदीप परदेशी व पोहेकॉ मनोज पाटील यांना पोलीस महासंचालक, म.रा. मुंबई यांनी प्रत्येकी 10,000/- रुपये बक्षीस दिले आहे.

हॅप्पीच्या सेवानिवृत्तीनिमित्त जळगाव जिल्हा पोलीस दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करीत असून, त्यांच्या उज्ज्वल सेवेस सलाम !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button