मॅक्रो व्हिजन अकॅडमी, रावेर येथे एलन टॅलेंट टेक्स परीक्षा उत्साहात

विविध शाळांतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
रावेर (प्रतिनिधी) : मॅक्रो व्हिजन अकॅडमी, रावेर येथे प्रतिष्ठेची एलन टॅलेंट टेक्स परीक्षा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून या परीक्षेला उत्तम प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल सावदा, निर्मल इंटरनॅशनल स्कूल पाचोरा, ॲड .ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल अमळनेर,अर्वाचीन इंडिया बुऱ्हानपूर अशा अनेक शाळांतील विद्यार्थ्यांनीही या परीक्षेला हजेरी लावून उल्लेखनीय सहभाग नोंदवला.
एलन टॅलेंट टेक्स परीक्षा गेल्या पाच वर्षांपासून मॅक्रो व्हिजन अकॅडमीत यशस्वीरित्या आयोजित केली जाते. या वर्षीही शिस्तबद्ध पद्धतीने परीक्षा पार पडून विद्यार्थ्यांनी आपले बौद्धिक व स्पर्धात्मक कौशल्य तपासण्याची संधी साधली. या उपक्रमासाठी शाळेचे व्यवस्थापक किरण दुबे व मुख्याध्यापक जनार्दन धनगर यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांचा बौद्धिक तसेच सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने शाळेत अशा राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा-परिक्षांचे आयोजन सातत्याने केले जाते.
परीक्षा यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकवर्ग व कर्मचाऱ्यांनी सहकार्य करून उत्कृष्ट आयोजन केले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मकता, ज्ञानवृद्धी आणि आत्मविश्वास वाढण्यास निश्चितच चालना मिळाली, असे मत परीक्षेच्या आयोजकांनी व्यक्त केले. शाळेचे चेअरमन श्रीराम पाटील, सेक्रेटरी स्वप्नील पाटील आणि जॉइंट सेक्रेटरी प्रमोद पाटील, शाळेच्या शैक्षणिक संचालिका वनिता पाटील यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक व आनंद व्यक्त केला आहे. तसेच शाळेचे उपाध्यक्ष ॲड. प्रवीण पासपोहे, खजिनदार विजय गोटीवांले, डायरेक्टर विनायक पाटील, धनराज चौधरी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.




