बियाणी स्कूलमध्ये आषाढी ‘दिंडी’ त पावलीने आणली रंगत

महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत लुटला फुगडीचा आनंद
भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ शहरातील राष्ट्रीय शिक्षा समिती संचलित बियाणी स्कूलमधील विद्यार्थ्यांनी वारकरी वेशात उत्कृष्टरित्या पावली खेळत विठ्ठल मंदिरापर्यंत दिंडी काढली. यावेळी पावलागणिक विठुरायाच्या जयघोष करण्यात आला. बियाणी स्कूल इंग्रजी व मराठी माध्यम तसेच जुनियर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीनिमित्त भव्य दिंडी सोहळा काढला. या सोहळ्याने शहर व परिसर वारीमय झाले होते. महिलांनी उत्स्फूर्तपणे विद्यार्थ्यांमध्ये सहभागी होऊन फुगडी खेळण्याचा आनंद घेतला.
मान्यवरांच्या हस्ते आरती
मातृभूमी चौकात उद्योजक मनोज बियाणी, डॉ.संगीता बियाणी, स्मिता बियाणी, आयुषी बियाणी, प्रवीण भराडिया, किशोर कोलते, किरण कोलते आदींसह शाळेचे मुख्याध्यापक रुद्रसेन गांठिया, शाळेचे सुपरवायझर अलीना आदी मान्यवरांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत पांडुरंगाची आरती केली. यानंतर विद्यार्थ्यांना प्रसाद वाटप करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी घेण्यात आलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक झाले.