मुक्ताईनगर नगरपंचायत; १७ प्रभागांत महिलांना ७ प्रभाग राखीव

प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : मुक्ताईनगर नगरपंचायतच्या 2025 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभागनिहाय आरक्षण सोडत बुधवार, 8 ऑक्टोबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, मुक्ताईनगर येथे पार पडली. या आरक्षण सोडतीकडे स्थानिक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील नागरिकांचे लक्ष लागले होते. एकूण १७ प्रभागांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले असून, त्यामध्ये महिलांसाठी ७ प्रभाग राखीव ठेवण्यात आले आहेत.
प्रभाग निहाय आरक्षण असे
- प्रभाग क्रमांक 1, 2, आणि 9, 12, 16 – प्रभाग इतर मागासवर्गीय (ना. मा. प्र.) वर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत, यातील 3 प्रभाग महिलांसाठी राखीव
- प्रभाग क्रमांक 3, 4, 11, 13, आणि 14 – सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले ठेवले असून, यात सर्वच नागरिकांना संधी
- प्रभाग क्रमांक 5, 10, 15, आणि 17 – सर्वसाधारण महिलांसाठी राखीव
- प्रभाग क्रमांक 6 – अनुसूचित जाती महिला
- प्रभाग क्रमांक 7 – अनुसूचित जमाती महिला
- प्रभाग क्रमांक 8 – अनुसूचित जाती सामान्य या प्रवर्गांसाठी राखीव
या आरक्षण प्रक्रियेवर स्थानिक राजकीय इच्छुकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांना आपला प्रभाग राखीव झाल्याने नाराजीचा सूर आहे, तर काहींना नव्याने संधी मिळणार असल्याने समाधान आहे. पुढील निवडणुकीत महिला आणि मागासवर्गीयांना मिळणाऱ्या व्यापक प्रतिनिधित्वामुळे नगरपंचायतीचा चेहरामोहरा बदलण्याची शक्यता आहे.




