आरोग्यक्राईमजळगावताज्या बातम्यानिवडपुरस्कारमहाराष्ट्रराष्ट्रीय-राज्यशासकीयसमस्यासामाजिक

दोन महिन्यांपासून बेपत्ता तरुणाना नशिराबाद पोलिसांनी काढले शोधून

ओरिसा राज्यात राबविली यशस्वी शोधमोहित

जळगाव (प्रतिनिधी) : २ महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाला नशिराबाद पोलीस स्टेशन पोलिसांनी शोध घेऊन त्याला पालकांच्या स्वाधीन केले. पालकांनी याबद्दल पोलीस पथकाचे आभार मानले. बँक खात्याच्या व्यवहारावरून त्या तरुणाचा पोलिसांनी चक्क ओरिसा राज्यातील जगन्नाथपुरी येथून ताब्यात घेतले.

मिळालेल्या माहितीनुसार, नशिराबाद पोलीस स्टेशन येथे जय संजयकुमार जावरे (वय १८, रा. राजेश्वर नगर, रिंग रोड, भुसावळ) १८ जुलै रोजी मिसींगची नोंद करण्यात आली होती. जय हा दि.१७ जुलै रोजी नशिराबाद येथुन कोणास काहीएक न सांगता निघुन गेला होता. नंतर त्याने त्याचा मोबाईल नंबर बंद करुन दिला होता त्याचे कुठल्याही प्रकारे लोकेशन मिळत नव्हते. परंतु पोलीस अधीक्षकमहेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधीकारी संदीप गावीत यांचे मार्गदर्शन घेवुन सहा. पोलीस निरी. ए. सी. मनोरे यांनी या मिसींग तपासाकमी सहा. फौज. राजेश मेंढे, पो.हे.कॉ. कमलाकर बागुल व मिसींगचे चौकशी अंमलदार पो.हे.कॉ. प्रशांत विरणारे व पोकों, प्रकाश कोळी यांचे तपासपथक नेमले होते.

या तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी कुठलाही धागादोरा नसतांना, मिसींग मुलाचे बँक व्यवहार तपासले असता त्यावरुन व्यवहार झाल्याचे समजल्याने, या तपास पथकाने सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार पो.हे.कॉ. शिवनारायण देशमुख, पो.हे.कॉ. दिलीप चिंचोले, पो.ना. सचीन सोनवणे, पो.कॉ. दिपक सोनवणे यांचे मदतीने तांत्रीक माहीती घेवुन व्यवहाराचे विश्लेषन केले. त्यावरुन मिसींग मुलगा हा ओरीसा राज्यात जगन्नाथ पुरी येथे असल्याचे समजुन आले. त्यानुसार पथकातील अंमलदार यांनी जगन्नाथ पुरी येथे जावुन दोन दिवस थांबुन अथक परीश्रम घेवुन एवढ्या मोठ्या शहरात या मुलाचा शोध घेतला.

त्यास सुमारे दोन महीन्यानंतर २० सप्टेंबर २०२५ रोजी सुखरुप परत आणुन त्याचे पालकांचे स्वाधीन केले आहे. या कारवाईबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नशिराबाद पोलीस स्टेशनच्या पोलीस पथकातील अधीकारी व पोलीस अंमलदार यांचे कौतुक केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button