
जळगाव (प्रतिनिधी) : येथील गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या साम्राज्य गणरायास पाचव्या दिवशी भक्तीभावात निरोप देण्यात आला. संस्थाध्यक्ष माजी खा. डॉ.उल्हास पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. रिसरातून ढोलताशाच्या गजरात श्री गणरायाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थीनीनी काही सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केले.
यावेळी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड, प्राचार्य विशाखा गणविर, डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगचे संचालक शिवानंद बिरादर, गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगचे प्रशासन अधिकारी प्रविण कोल्हे यांचेसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थीत होते. तापी नदीवर श्री गणरायास भक्तीमय वातावरणात निरोप देण्यात आला.




