अभिवादनआरोग्यजळगावताज्या बातम्याशासकीयशैक्षणिक

प्रसुतीपूर्व विभागात आग : प्रसंगावधान दाखविणाऱ्या परिचारिकांचा अधिष्ठातांनी केला सन्मान

शासकीय रुग्णालयात अग्निशामक यंत्राचा योग्य वापर

जळगाव (प्रतिनिधी) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागात सोमवारी दि. २९ रोजी स्पार्कींग होऊन शॉर्टसर्किटमुळे आग लागली होती. मात्र प्रसंगावधान राखून तेथील अधिपरिचारिकानी तात्काळ अग्निशामक यंत्र (fire extinguisher) वापरून तात्काळ आग विझविल्याबद्दल अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी तात्काळ दखल घेत दोघंही अधिपरिचारिकांचा दालनात बोलावून सन्मान केला.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात प्रसुतीपूर्व दाखल कक्ष क्र. ६ येथे नेहमीप्रमाणे गरोदर माता व त्यांचे नातेवाईक यांची उपस्थिती होती. तेथे वैद्यकीय अधिकारी, परिचारिका वर्ग व कर्मचारी कर्तव्य बजावीत असताना अचानक १२ वाजून २० मिनिटांनी मुख्य दरवाजाजवळ स्विचबोर्डजवळ स्पार्किंग होऊन शॉर्टसर्किटमुळे आग लागली. कर्मचाऱ्यांनी घटना अधिपरिचारिका ज्यूलीना पिंपळसे आणि सुवर्णा पुरी यांना सांगितली. त्यांनी तात्काळ धाव घेऊन आग पाहत प्रसंगावधान राखले.

तत्काळ विभागात असलेले २ अग्निशामक यंत्र (fire extinguisher) घेतले. त्याचा वापर करून आगीवर मारून नियंत्रणात आणली. विद्युत विभागाला तात्काळ सूचना देऊन उपस्थित कर्मचारी, नातेवाईक, रुग्णांना घाबरून न जाण्याचे सांगून दिलासा दिला. त्यांच्या कृतीमुळे त्यांचे कौतुक केले जात आहे. अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी घटनेची दखल घेऊन दोन्ही अधिपरिचारिका ज्यूलीना पिंपळसे आणि सुवर्णा पुरी यांना दालनात बोलावून पुष्पगुच्छ देत सन्मान केला. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. धर्मेंद्र पाटील, सहयोगी प्रा. डॉ. संगीता गावित, सहायक अधिसेवक तुषार पाटील उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button