पालमंत्र्यांच्या हस्ते नितीन कुरकुरे, ॲड.अमोल चौधरी, ॲड. कालिदास ठाकूर, डॉ.दिपक जैन यांचा गौरव

जळगाव (प्रतिनिधी) : भारतीय स्वातंत्र्याच्या ७९ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित मुख्य ध्वजारोहण समारंभानंतर विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय व आदर्श कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, संस्था, ग्रामपंचायती व शासकीय विभागांना पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार स्मिता वाघ आणि आमदार सुरेश (राजू मामा) भोळे यांच्या हस्ते गौरवविण्यात आले.
यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते सावदा महसूल विभाग भाग १ व २ साठी राज्य शासनातर्फे सनद अधिसूचना प्राप्त करण्यासाठी सावदा गावचे प्रतिनिधित्व करुन नितीन कुरकुरे, ॲड.अमोल चौधरी, ॲड. कालिदास ठाकूर, डॉ.दिपक जैन यांना सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल , महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, पुरस्कार विजेते, मान्यवर, नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविका जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी केले. सुत्रसंचालन नीतीन पाटील, अपूर्वा वाणी आणि सरीता खाचणे यांनी केले.




