अभिवादनआरोग्यजळगावताज्या बातम्यापुरस्कारमहाराष्ट्रशैक्षणिक

प्रा.डॉ.डि.आर.पाटील यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात

पारोळा (प्रतिनिधी) : येथील राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.डि.आर.पाटील ३० वर्षांची अध्यापनाची सेवा देऊन सेवा निवृत्त झाले. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ॲड.रोहन मोरे यांच्या हस्ते प्रा.डॉ.डि.आर.पाटील व मंजुषा पाटील यांचा महाविद्यालयाच्या वतीने सन्मानचिन्ह, भेटवस्तू व बुके देवून सत्कार करण्यात आला.

सुरुवातीला मनाली पाटील, कुलश्री बडगुजर, हर्षदा चौधरी यांनी मंगलवाद्य व ढोल ताशांच्या गजरात प्रा.डॉ.डि.आर.पाटील व सर्व सहकारी महात्मा फुले यांच्या स्मारकजवळ आले तेथे पुष्पार्पण करून नंतर सत्कार स्थळी सर्वांनी त्यांना स्थानापन्न केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.व्हि.आर.पाटील तर प्रमुख अतिथी संचालक ॲड.रोहन मोरे, म्हसदी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजीव गिरासे, देवगावचे सरपंच समीर पाटील, तुकाराम नेरकर धुळे, उपप्राचार्य डॉ . एस. बी.भावसार, डॉ.ए.एम.पाटील हे उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते राणी लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमेला माल्यार्पन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष ॲड.वसंतराव मोरे, संध्याताई मोरे, सचिव पराग मोरे, संचालक मंडळ यांनी भावी आयुष्यासाठी शुभेच्छापर संदेश पाठवला. डॉ.डि.एन. सुर्यवंशी, डॉ.आर.बी.नेरकर, उपप्राचार्य डॉ.जी.पी.बोरसे, डॉ.आय.एस.पाटील, जान्हवी पाटील, हिमानी पाटील, डॉ.स्नेहल पाटील, प्रा.एस.आर. पाटील यांनी प्रा.डॉ.डि.आर.पाटील यांच्या कार्याचा मनोगतात गौरव केला. ॲड‌.रोहन मोरे यांनी मनोगतात डॉ.डि.आर.पाटील यांनी महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागातील दिलेले योगदान, संशोधन प्रयोगशाळेद्वारे संशोधक तयार करणे यामुळे महाविद्यालयाच्या लौकिकात भर पडली असून त्यांनी भविष्यात देखील त्यांच्या ज्ञानाचा उपयोग सामाजिक कार्य करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. प्राचार्य डॉ.संजीव गिरासे यांनी प्रा.डॉ.डि.आर.पाटील यांचे भौतिकशास्त्र विषयातील व नॅनो टेक्नॉलॉजी मध्ये दिलेले योगदान अद्वितीय आहे. त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

प्रा.डॉ.डि.आर.पाटील यांनी मनोगतात महाविद्यालयात भौतिकशास्त्र विषयाच्या अध्यापनाची संधी दिली त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष ॲड.वसंतराव मोरे व संचालक मंडळाचे ॠण व्यक्त केले. प्राचार्य, प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी वृंद व विद्यार्थी यांच्या सहकार्याने तीस वर्षांची अविरत अध्यापनाची सेवा करता आली. भविष्यात देखील भौतिकशास्त्र विषयात योगदान देत राहण्याचे आश्वासित केले.

अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ.व्हि.आर.पाटील यांनी डॉ.डि.आर.पाटील यांचे भौतिकशास्त्र विषयातील अध्यापन व महाविद्यालयातील संशोधन, आविष्कार व प्रशासकिय सेवेचा गौरव केला. सूत्रसंचालन डॉ.एस.व्हि.चव्हाण यांनी तर आभारप्रदर्शन प्रा.जे.बी.पाटील यांनी केले. कार्यक्रमास मित्रपरिवार ,आप्तेष्ट, विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button