
जळगाव (प्रतिनिधी) : येथील गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात स्टुडन्ट कौन्सिल इंस्टॉलेशन (विद्यार्थी परिषद गठीत) समारंभाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. नितीन भोळे (विभाग प्रमुख, बेसिक सायन्सेस अँड हुम्यानिटिज), प्रा. तुषार कोळी (अधिष्ठाता), प्रा दीपक झांबरे (डिप्लोमा समन्वयक) व सर्व विभाग प्रमुख तसेच शिक्षक वर्ग आणि सर्व शाखांचे विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व गोदावरी आजीच्या प्रतिमेस हार अर्पण करून तसेच दीप प्रज्वलन करून झाली. त्यानंतर स्टुडन्ट कौन्सिल स्थापनेच्या समारंभात सर्व शाखांच्या कौन्सिलच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पदानुसार बॅचेसचे वाटप करून त्यांना गौरवान्वीत केले. शाखा निहाय विद्यार्थी प्रेसिडेंट यांनी त्यांच्या विभागाच्या स्टुडन्ट कौन्सिलची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली व आगामी काळात त्यांच्या कौन्सिलच्या माध्यमातून करण्यात येणार्या कार्यक्रमाचा आढावा त्यांच्या भाषणातून दिला. त्यामध्ये ज्ञानदीप पाटील(सेसा), मयूर कोळी (मेसा), प्रणव थोरात (टेसा), प्रेरणा पाटील (आर्टिफिशियल इंटेलिजन्स व डाटा सायन्स), सारंग पाटील (ईईएसए) यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. त्यानंतर प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
उत्कृष्ट प्रेझेंटेशन केल्याबद्दल उएड- प्रेसिडेंट ज्ञानदीप पाटील व डिंकी शदानी यांना अवार्ड देण्यात आले. यशस्वीतेसाठी स्टुडन्ट कौन्सिलचे फॅकल्टी कॉर्डिनेटर, प्रा. आर. व्ही. पाटील (टेसा) व डॉ. निलेश चौधरी(सेसा) प्रा. प्रवीण पाटील (मेसा), प्रा. रोहित नेमाडे (ईईएसए), प्रा. रेश्मा अत्तरदे(एईएसए) यांनी डॉ. नितीन भोळे (विभाग प्रमुख, बेसिक सायन्सेस अँड हुम्यानिटिज) यांच्या मार्गदर्शनाखाली परिश्रम घेतले. सूत्रसंचालन तुळजा महाजन, हिमांशु चौधरी, जान्हवी चव्हाण , प्रियांका चौधरी या विद्यार्थ्यांनी केले.सदर उपक्रमाबाबत गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील(सचिव), डॉ. केतकी पाटील (सदस्य), डॉ. वैभव पाटील (डीएम कार्डिओलॉजिस्ट), डॉ. अनिकेत पाटील यांनी कौतुक केले.




