
जळगाव (प्रतिनिधी) : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या वतीने दि. १६ व १७ नोव्हेंबर रोजी जळगाव जिल्हास्तर युवा महोत्सव संपन्न झाला. यामध्ये डॉ. अण्णासाहेब जी.डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या (स्वायत्त) विद्यार्थिनी लालन जितेंद्र डोळसे यांना कथालेखन स्पर्धेत प्रथम, दीपाली विनोद सोनी यांना वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय तर भाग्यश्री लक्ष्मण चौधरी यांना कविता लेखन स्पर्धेत तृतीय पारितोषिके प्राप्त झाले तसेच त्यांची नाशिक विभागीय युवा महोत्सवासाठी निवड झाली आहे.
पारितोषिक प्राप्त विद्यार्थींनीना प्रा. दीपक पवार, प्रा. शांताराम तायडे आणि प्रा. अमृता नेतकर यांनी मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. व्ही.जे. पाटील, उपप्राचार्य डॉ. प्रमोद तायडे, उपप्राचार्य डॉ. सत्यजित साळवे, कला मंडळ प्रमुख डॉ. अनिता कोल्हे यांनी विजेत्या विद्यार्थींनीचे अभिनंदन आणि पुष्पगुच्छ देवून स्वागत केले तसेच भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.




