
स्व. चांदोरकर प्रतिष्ठानचा उपक्रम
जळगाव (प्रतिनिधी ) आषाढी एकादशीनिमित्त ‘बोलावं विठ्ठल ‘ या संगीत नृत्याचा कार्यक्रम रविवार ६ जुलै रोजी कांताई सभागृहात आयोजित करण्यात आला [आहे. संध्याकाळी ठीक ६.३० वाजता दिंडीने कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे.
स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या १० वर्षांपासून चिमुकल्या माऊलींच्या माध्यमातून आषाढी एकादशी निमित्ताने आयोजित “बोलावा विठ्ठल” हा भक्ती रसाने भरलेला कार्यक्रम आयोजित करीत असते. . दिंडी, पालखी, दिंडीतले खेळ, आणि विठुमाऊलीची भक्तिगीते असे कार्यक्रमाचे आयोजन असते. या कार्यक्रमास भवरलाल अँड कांताबाई फाउंडेशन चे सहकार्य लाभत असते.
. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती अनुभूती शाळेच्या संचालिका निशा जैन उपस्थित राहणार आहेत. लहान माऊलींच्या माध्यमातू सादर होणाऱ्या या कार्यक्रमाचे संगीत संयोजन ऐश्वर्या परदेसी व भूषण खैरनार करीत असून तबला संगत यज्ञेश जेऊरकर करीत आहे. दिंडीचे संगीत व नृत्य संयोजन अनुभूती शाळेचे नाना सोनवणे करीत आहेत.या कार्यक्रमात प्रभाकर कला संगीत अकादमी व नुपूरनृत्यांगण च्या विद्यार्थिनी नृत्याविष्कार सादर करणार आहेत. चिमुकल्या माऊलींच्या कलाविष्काराला प्रोत्साहन देण्यासाठी जळगावकर रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती व भवरलाल अँड कांताबाई फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आलेले आहे.