अभिवादनऐतिहासिकजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराष्ट्रीय-राज्यशासकीय

जिल्ह्यातील २९ गावांमध्ये वीर जवानांच्या स्मरणार्थ शहीद स्मारक उभारण्यास शासनाची मंजुरी

पालकमंत्र्यांच्या काल केलेल्या मागणीला उपमुख्यमंत्री यांच्याकडून आज आली मंजुरी

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यातील सैन्यात सेवारत असताना युध्दात वा युध्दजन्य परिस्थितीत धारातीर्थी पडलेल्या वीर जवानांच्या स्मरणार्थ उभारण्यात येणाऱ्या शहीद स्मारकांसाठी शासनाने जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेतून निधी मंजूर केला आहे. प्रत्येकी १५ लाख रुपये प्रमाणे २९ स्मारकांसाठी एकत्रित ४३५ लाख रुपये “एक वेळची विशेष बाब” म्हणून उपलब्ध करून देण्यात आले असून, या निर्णयामुळे जिल्ह्यातील शहीद गावांमध्ये प्रेरणादायी स्मारकांची उभारणी होणार आहे.

काल जिल्हा वार्षिक योजनेच्या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मागणीला तात्काळ प्रतिसाद देत या स्मारकांना मंजुरी देण्याचे आश्वासन दिले होते. त्याला अनुसरून आज शासनस्तरावरून मंजुरी कळविण्यात आली आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा नियोजन अधिकारी यांना शासनाने याबाबत आदेश कळवले आहेत.

या निर्णयामुळे जिल्ह्यातील २९ ठिकाणी ऐतिहासिक व प्रेरणादायी शहीद स्मारक उभारले जाणार असून, शहीद कुटुंबांचा सन्मान आणि भावी पिढ्यांना प्रेरणा देणारे केंद्रबिंदू गावोगावी उभे राहणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button