आरोग्यक्राईमजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराष्ट्रीय-राज्यशासकीयशेतकरीसमस्या

२५ किलो गांजासह एकजण स्थानीक गुन्हे शाखेकडून जेरबंद

जळगाव (प्रतिनिधी) : रावेर तालुक्यातील सहस्त्रलिग या गावात शेतात अवैधररित्या कँनाबीस (गांजा) लागवड केल्याप्रकरणी जळगावच्या स्थानीक गुन्हे शाखेने महेरबान रहेमान तडवी (वय-३२ रा. सहस्त्रलिग, ता. रावेर) याला जेरबंद केले आहे. या शेतातून २५ किलो लागवड केलेच्या सुमारे १ लाख ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळुन आला. ही कारवाई ७ रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पो.नि राहुल गायकवाड यांना माहिती मिळाली की, एक इसम सहस्त्रलिग, ता. रावेर गावी त्याचे शेतात अवैधररित्या गांजासदृश अंमली पदार्थाची बेकायदेशीरपणे लागवड केलेली आहे. त्याच्यावर कारवाई करणेसाठी स्थानिक गुन्हे शाखेकडिल पोउपनि सोपान गोरे व पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करुन त्या ठीकाणी कार्यवाई करण्याचे सुचना दिल्या.

त्यानुसार पथकाने सहस्त्रलिग येथे जावुन खात्री करुन शेतात छापा टाकला असता सदर इसमाच्या शेतात २५ किलो वजनाचा १,७०,०००/- रुपये किमतीचा कँनाबीस (गांजा) लागवड केलेली असल्याची मिळुन आले. त्यावेळी पथकाने लागवड केलेल्या इसम महेरबान रहेमान तडवी (वय-३२ रा. सहस्त्रलिग ता. रावेर) याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. याप्रकरणी रावेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई
जिल्हयात अंमली पदार्थ तस्करी व अंमली पदार्थाचे सेवन या अनुशंगाने पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते तसेच , फैजपुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांनी कारवाई करण्याच्या सुचना दिल्या आहेत. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस निरीक्षक विशालस जैस्वाल, रावेर, पोउपनिरी सोपान गोरे, पोहवा संदीप चव्हाण, यशवंत टहाकळे पो. अं प्रदिप सपकाळे, बबन पाटील, सचिन घुगे, मयुर निकम, चापोहेकॉ भरत पाटील यांनी कारवाई केली आहे. तसेच रावेर पोलीस स्टेशनचे सपोनि मीरा देशमुख, पोहेकॉ ईश्वर चव्हाण, पो. अं संभाजी बीजागरे, राहुल परदेशी यांच्या पथकाने या कारवाई करिता मदत केली. पुढील तपास पोउपनि मनोज महाजन हे करित आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button