
गोदावरी अभियांत्रिकी, वैद्यकीय महाविद्यालयात वाढदिवसानिमीत्त शुभेच्छांचा वर्षाव
जळगाव (प्रतिनिधी) : सामाजिक, राजकीय आणि विविध क्षैत्रात डॉ. केतकी पाटील यांचे कार्य कौतुकास्पद असून नाविण्यपुर्ण संकल्पनातून या देशाच्या गौरवशाली इतिहासाची माहिती विविध उपक्रमातून ते जनतेला करून देत आहेत.त्यांच्या कार्याची देश दखल घेईल, असा विश्वास माजी खा. डॉ.उल्हास पाटील यांनी आज बोलून दाखवला.
गोदावरी फाउंडेशनच्या सदस्य डॉ. केतकी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात सामाजिक बांधिलकी, महिला सक्षमीकरण आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी फाउंडेशन परिवाराने हा सोहळा आयोजित केला होता यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील आणि सचिव डॉ. वर्षा पाटील यांची विशेष उपस्थिती होती.
यावेळी डॉ. केतकी पाटील यांचे स्वागत पुष्पगुच्छ, औक्षण व अभिवादनाने करण्यात आले. यानंतर त्यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर प्रकाश टाकणारा परिचय चित्रफितव्दारे सादर करण्यात आला. या सोहळ्यात डॉ. विजयकुमार पाटील प्राचार्य, गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, डॉ. प्रशांत वारके प्राचार्य, गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, निलिमा चौधरी प्राचार्य, गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूल, डॉ. निलिमा वारके प्राचार्य, डॉ. वर्षा पाटील महिला कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अप्लिकेशन प्रा. दीपक झांबरे समन्वयक, गोदावरी तंत्रनिकेतन, डॉ. कविता देशमुख प्राचार्य, डॉ. वर्षा पाटील महिला कॉलेज ऑफ होम सायन्स,डॉ. नयना झोपे प्राचार्य, डॉ. उल्हास पाटील लॉ कॉलेज इ मान्यवर उपस्थीत होते.
यावेळी चेतना सोनवणे द्वितीय वर्ष संगणक शाखा, गोदावरी तंत्रनिकेतन हिने एक भावस्पर्शी गीत सादर करत उपस्थितांची मने जिंकली. सर्व प्राचार्यांनी आपल्या मनोगतातून गोदावरी फाउंडेशनच्या कार्यपद्धतीचे आणि डॉ. केतकी पाटील यांच्या दूरदृष्टीचे कौतुक करत, त्यांना शुभेच्छा दिल्या. डॉ. केतकी पाटील यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त करताना सांगितले की, गोदावरी फाउंडेशन हे केवळ एक शैक्षणिक संस्थांचे समूह नसून, समाज घडवण्याचे एक माध्यम आहे. शिक्षण, आरोग्य आणि महिला सक्षमीकरण या आमच्या मूलभूत मूल्यांमध्ये सर्वांचा सहभाग अनिवार्य आहे.
सुत्रसंचालन खुशाली बेलदार यांनी केले तर समन्वयक प्रा. हेमराज धांडे आणि प्रा. नकुल गाडगे (ग्रंथपाल)यांच्या मार्गदर्शना नुसार प्राध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
सत्कार समारंभप्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालय, डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजीओथेरेपी, डॉ. उल्हास पाटील होमीओपॅथी महाविद्यालय, गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग आणि डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग यांच्या संयुक्त विद्यमाने गोदावरी फाउंडेशनच्या सदस्या डॉ. केतकी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, डॉ. सुहास बोरले, हृदयविकार तज्ज्ञ डॉ. वैभव पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन.एस. आर्विकर, डीन डॉ. प्रशांत सोळंके, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, आयुर्वेद महाविद्यालयाचे अधीष्ठाता वैद्य हर्षल बोरोले, होमीओपॅथीचे अधीष्ठाता डॉ. आर.के. मिश्रा, फिजीओथेरेपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर, नर्सिंगच्या प्राचार्या विशाखा गणवीर, केतकी पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य शिवानंद बिरादर, रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत, राजपुरोहीत डी.टी.राव, संजय भिरूड आणि सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. सत्कार समारंभप्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रमांचेही सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीसह डॉ. केतकी पाटील यांच्या हस्ते केक कापण्यात आला. प्रास्ताविक डीन डॉ. प्रशांत सोळंके यांनी केले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. केतकी पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
कौटुंबिक मुल्येही जोपासा – डॉ. केतकी पाटील
गोदावरी हेल्थ सिटीमध्ये येणारा प्रत्येक विद्यार्थ्याची बौध्दिक क्षमता ही दांडगीच आहे. या संस्थेत पाय ठेवल्यानंतर संस्थेचे गोदावरी हे नाव लक्षात घेतल्यास आपल्या प्रत्येकात मातृभक्ती जागृत झाल्याशिवाय राहत नाही. प्रत्येक विद्यार्थ्याने शिकून कर्तबगार झाल्यानंतर करीअरसोबत कौटुंबिक मुल्येही जोपासावी असा सल्ला गोदावरी फाउंडेशनच्या सदस्या डॉ. केतकी पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिला.




