स्वामी विवेकानंद विद्या मंदिर, रावेरच्या मुलांच्या संघाने मारली बाजी

जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावत विभागीय स्पर्धेसाठी दोघांची निवड
रावेर (प्रतिनिधी) : जळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे १० ऑक्टोबर रोजी जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी आयोजित जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा २०२५-२६ पार पडल्या. त्या स्पर्धेत स्वामी विवेकानंद विद्या मंदिर, रावेर शाळेच्या १७ वर्षां आतील मुलांच्या संघाला द्वितीय क्रमांक मिळवला असून विभागीय स्तरीय स्पर्धेसाठी अनिकेत रहमान तडवी व रंजीत भायलाल भिलाला या दोन खेळाडूंची निवड झाली आहे.
या यशाबद्दल स्वामी परिवाराचे अध्यक्ष रवींद्र पवार, सचिव मनिषा पवार, माध्यमिक विभागाचे मुख्याधापक राजू पवार, मुख्याध्यापिका धांडे मॅडम, पर्यवेक्षिका निळे मॅडम, क्रीडाशिक्षक मंगेश महाजन, विष्णू चारण यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील विभागीय स्पर्धेसाठी या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत. या यशाबद्दल त्यांना श्री सपकाळे सर, श्री मैराळे सर तसेच स्वामी स्पोर्ट्स क्लबचे सर्व आजी- माजी खेळाडूंचे सहकार्य लाभले.




