उत्राण येथे खान्देश भूषण रविकिरण महाराज यांच्या किर्तनास प्रचंड जनसमुदाय

उत्राण, ता.एरंडोल (प्रतिनिधी) : येथे उत्राण विकास मंच व समस्त ग्रामस्थ मंडळी यांच्या वतीने खान्देश भूषण ह. भ.प. श्री.रविकिरण महाराज यांचे समाज प्रबोधनपर कीर्तनाचे आयोजन विविध कार्यकारी सहकारी सोसायटी च्या प्रांगणात करण्यात आले होते. यावेळी उत्राण येथे कीर्तनप्रसंगी ५ हजारांच्या हुन अधिक माताभगिनी व पुरुष मंडळींची उपस्थिती होती.
महाराजांनी आपल्या नेहमीच्या शैलीत अतिशय उत्कृष्टपणे समाज प्रबोधनपर कीर्तन केले विशेष म्हणजे एवढा मोठा जनसमुदाय कीर्तन संपेपर्यंत ३ तास शांतपणे बसून कीर्तनात मग्न होता. गावकऱ्यांनी परिसरातील नागरिकांनी महाराजांचे विचार अतिशय शांतपणे ऐकून महाराजांचे समाज प्रबोधन केल्याबद्दल आभार मानले. आजच्या परिस्थितीला रविकिरण महाराजांसारख्या कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनकारांची आवश्यकता असून असे उपक्रम राबविणे ही काळाची गरज असल्याच्या भावना उत्राण सह परिसरातील नागरिकांमधून निघाल्या.
कीर्तनाचे आयोजन उत्राण विकास मंचाचे अमोल महाजन, चंद्रकांत वाघ व विलास महाजन यांनी केले होते. याप्रसंगी संतसेवेची जबाबदारी शिवसेना जळगाव जिल्हा प्रमुख वासुदेव पाटील यांनी स्वीकारली होती व जळगाव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले यांनी विशेष मदत केली. यशस्वितेसाठी वाडी संस्थान मंदिर भजनी मंडळ, पोलिस पाटील राहुल महाजन, पत्रकार प्रकाश कुवर, माजी सरपंच विनोद महाजन, प्रविण महाजन, ईश्वर चौधरी, प्रदिप धनगर, नरेंद्र कोळी, सागर महाजन, राजू कोळी, डॉ.पराग महाजन पाचोरा, छोटू मामा चौधरी व समस्थ ग्रामस्थ मंडळी यांनी सहकार्य करून परिश्रम घेतले.




