शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची जीव धोक्यात घालून वाटचाल

विद्यार्थ्यांना करावी लागतेय ५-६ किलोमीटर पायपीट
जळगाव, (प्रतिनिधी) : प्रशासनाच्या अवकृपेने विद्यार्थ्यांचे शेक्षणिक नुकसान होत आहे. चोपडा तालुक्यातील कुंड्यापाणी गावातील विद्यार्थ्यांना खराब रस्ते आणि हिंस्त्र प्राण्यांच्या धोक्याने शाळेत जाण्यासाठी दररोज ५-६ किलोमीटर भीतभीत पायपीट करावी लागत आहे. एसटी महामंडळाची बस सेवा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.
कुंड्यापाणी ते बिडगाव रस्त्यावर पावसाने मोठे खड्डे पडले आहेत, तसेच झाडेझुडपांमुळे बस चालकांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे बस बिडगाव येथून पुढे जात नाही, अशी माहिती बस चालकांनी दिली आहे. अनेकदा बसच्या काचा फुटल्याने नुकसान भरपाई द्यावी लागते, असेही चालकांचे म्हणणे आहे.