
रावेर, (प्रतिनिधी) : ऐनपूर येथील स्वामी अकॅडमी शाळेत गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुपुजन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक मनु अँटोनी हे होते. प्रारंभी स्वामी विवेकानंद, सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षक व शिक्षकवृंद यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन पूजन केले. विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेविषयी भाषणे तर काही विद्यार्थ्यांनी गाणी सादर केली. मुख्याध्यापक मनु अँटोनी, अनिकेत, निकिता राणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्वामी शाळेचे अध्यक्ष रवींद्र पवार व सचिव मनिषा पवार यांनी सर्वांना गुरुपौर्णिमेनिमित्त शुभेच्छा दिल्या.
सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांना स्वतः बनवलेली ग्रीटिंग कार्ड, गिफ्ट दिले आणि आशीर्वाद घेतला. मुख्याध्यापक यांनी सुद्धा सर्व शिक्षकांना भेटवस्तू दिल्या. सूत्रसंचालन पल्लवी महाजन यांनी तर आभार निलेश महाजन यांनी मानले. यशस्वीतेसाठी मिलिंद पाटील, शारदा कोंडे, रुपाली कोंडे, रुपाली महाजन, नेहा पाटील, अनुपमा पाटील व शिपाई कर्मचारी आशा सोनार, लक्ष्मी चौधरी यांनी परिश्रम घेतले.