अभिवादनआरोग्यजळगावताज्या बातम्याशैक्षणिक
श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात राष्ट्रीय शिक्षण दिनानिमित्त रंगभरण स्पर्धा

जळगाव (प्रतिनिधी) : श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयांमध्ये भारताचे पहिले शिक्षणमंत्री, भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती “राष्ट्रीय शिक्षण दिन” म्हणून साजरी करण्यात आली. जयंती निमित्त इयत्ता तिसरी व चौथी च्या विद्यार्थ्यासाठी रंगभरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
सुरुवातील अबुल कलाम आझाद यांच्या प्रतिमेला मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी माल्यार्पण करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. पर्यवेक्षक शितल कोळी यांनी काम पहिले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक इयत्ता तिसरीची श्रुती पवन पाटील व द्वितीय क्रमांक अक्षदा सचिन कोठे हिने पटकावला. त्यांना शैक्षणिक वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन स्वाती नाईक व सूत्रसंचालन रूपाली आव्हाड यांनी केले.




