
जळगाव, (प्रतिनिधी) : येथील गुलाबराव देवकर कॉलेजमध्ये 10 जुलै रोजी झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेत रावेरच्या मॅक्रो व्हिजन अकॅडमी शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून घवघवीत यश संपादन केले आहे.
जिल्ह्यातील अनेक शाळांच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. या दुसऱ्या क्रमांकावर बाजी मारत आयुष पाटील (इयत्ता आठवी) याने लक्षवेधी कामगीरी केली. तसेच आठवीतील मयंक पाटील, कृष्णा देशमुख, लक्ष्मीनंदन चितोडे आणि नववीतील दिवेश पाटील, पृथ्वीराज चव्हाण, यज्ञ वाघ, कार्तिक बोंडे या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला. या सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे शिक्षक सुरज भालेराव, राहुल इंगळे व सना अन्सारी यांनी योग्य मार्गदर्शन लाभले.
सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे शाळेचे चेअरमन श्रीराम पाटील, सेक्रेटरी स्वप्नील पाटील आणि जॉइंट सेक्रेटरी प्रमोद पाटील यांनी अभिनंदन केले. तसेच या वर्षाच्या शैक्षणिक डायरेक्टर वनिता पाटील व शाळेचे उपाध्यक्ष ऍड. प्रवीण पासपोहे, खजिनदार विजय गोटीवांले, डायरेक्टर धनराज चौधरी, व्यवस्थापक किरण दुबे सर, शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री.जे .डी. सर यांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या.
तसेच शाळेचे शिक्षक वृंद यांनीही विजेत्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.