S.T.आरक्षणासाठी बंजारा समाजाचा उद्या जळगावात एल्गार मोर्चा

समाज बांधवांनी मोठ्या संख्येने मोर्च्यात सहभागी होण्याचे आवाहन
जळगाव (प्रतिनिधी) : बंजारा समाजाला (S.T.) अनुसूचित जमातीत समावेश करण्यासह विविध मागण्यासाठी बंजारा आरक्षण कृती समिती जळगाव जिल्ह्याच्या वतीने मंगळवार, ७ ऑक्टोबर रोजी जळगावात भव्य एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे. बंजारा समाजाच्या या मोर्च्यात मोठ्या संख्येने समाज बांधवांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन सकल बंजारा समाजाच्यावतीने करण्यात आले आहे.
सकल बंजारा समाज जळगाव जिल्हा च्या वतीने आयोजित केलेल्या या मोर्चामध्ये राज्यभरातून समाजबांधव उपस्थित राहणार आहे. सकाळी ११ वाजत जी.एस. ग्राउंड (शिवतीर्थ मैदान) येथून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. येथून नवीन बस स्थानक, स्वतंत्र चौक या मार्गाने मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. त्याठिकाणी बाजार समाजाचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी यांना निवेदन देतील.
या आहेत मागण्या
बंजारा समाजाला (S.T.) अनुसूचित जमातीत समावेश करण्यासह दैद्राबाद गॅझेट नुसार आरक्षण द्यावे. सि.पी. बेरार गॅझेट लागू करा. लोकूर समितीच्या शिफारशी लागू करा, या प्रमुख मागण्या यावेळी करण्यात येणार आहे.




