रोटरी सेंट्रलच्या दिपोत्सवामुळे वृद्धाश्रमातील आजी आजोबांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव!

जळगाव (प्रतिनिधी) : येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलतर्फे मातोश्री आनंदाश्रम वृद्धाश्रम येथे दरवर्षाप्रमाणे आयोजित केलेल्या दीपोत्सवामुळे तेथील आजी – आजोबांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव उमटले.
रोटरी सेंट्रलतर्फे सावखेडा येथील आनंदाश्रमात जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या प्रमुख उपस्थितीत गायक विनोद बलदवा व पवन झंवर आणि सहकाऱ्यांच्या भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. रेड्डी यांनी संवाद साधताना रोटरी सेंट्रलच्या या दीपोत्सवाचे कौतुक करून आजी आजोबांना त्यांच्या व्यक्तिगत समस्येसाठी पोलीस दल त्यांच्या पाठीशी आहे असा दिलासा दिला.
प्रास्ताविक अध्यक्ष जितेंद्र बरडे यांनी तर सूत्रसंचालन प्राचार्य गोकुळ महाजन यांनी केले. आभार मानद सचिव ॲड. केतन ढाके यांनी मानले. कार्यक्रमास रोटरी सेंट्रलचे महेंद्र रायसोनी, मिलन मेहता, डॉ.अपर्णा भट – कासार, महेंद्र गांधी, राजेश चौधरी, दिनेश थोरात, रवींद्र वाणी, दीपक नाथानी, ॲड. रवींद्र कुलकर्णी, समर्थसिंग पाटील, अजित वाणी, अभिषेक निरखे, निकेश विसपुते, संजय वाघ, ज्योस्साना रायसोनी, माधुरी थोरात, अनिता बरडे पल्लवी ढाके आणि आनंदाश्रमाचे व्यवस्थापक राजेंद्र कुंवर यांची उपस्थिती होती.




