एस.एम.आय.टी. कॉलेजजवळच्या सिद्धिविनायक मंदिरात उद्या गणेश प्रतिष्ठापना

जळगाव (प्रतिनिधी) : एस.एम.आय.टी. कॉलेजजवळ सिद्धिविनायक महिला मंडळाने उभारलेल्या नवीन मंदिरात श्री सिद्धिविनायक गणेशाची प्राणप्रतिष्ठा उद्या दि. २८ नोव्हेंबर रोजी करण्यात येत आहे. यासाठी यज्ञ आचार्य म्हणून ह.भ.प. मनोज महाराज कुलकर्णी तर कळसरोपणाचा मान प.पू. महामंडलेश्वर माधवानंद स्वामी सरस्वती (खर्ची, ता. एरंडोल) यांना लाभणार आहे. रात्री ८ वाजता कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.
महाप्रसादाचे आयोजन दि. २९ नोव्हेंबर रोजी दुपारी ११ ते ३ या वेळेत करण्यात आले आहे. या तीन दिवसीय कार्यक्रमाचा प्रारंभ दुपारी ४ वाजता करण्यात आला. कलशधारी महिला, भगवे ध्वज, लेझीम, टाळ-मृदंग पथकांच्या निनादात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेने परिसर दुमदुमून गेला. प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि शनिवारी होणाऱ्या महाप्रसादाचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा, असे आवाहन सिद्धिविनायक महिला मंडळातर्फे करण्यात आले आहे.




