‘ बोलवा विठ्ठल ‘ ने घडविली आषाढीची वारी

चिमुकल्यांच्या प्रदर्शनाने रसिकश्रोते मंत्रमुग्ध
जळगाव (प्रतिनिधी)- स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आणि डॉ. भवरलाल आणि कांताबाई जैन फाउंडेशनच्या वतीने वारीचा यंदाचा दशकपुर्ती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. परंपरेप्रमाणे अनुभूती शाळेच्या विद्यार्थ्यांनी पालखी, दिंडी, व खेळ आदींनी वातावरण भक्तिमय झाले. दीपप्रज्वलन प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विवेकानंद कुलकर्णी, सचिव अरविंद देशपांडे, रायसोनी महाविद्यालयाच्या संचालक डॉ. प्रीती अग्रवाल, व जेष्ट रंगकर्मी प्रा. राजेंद्र देशमुख यांनी केले या कार्यक्रमात माऊलींनी आपली कला सादर केली.
बासरी मोडली – संहिता जोशी, सुंदर ते ध्यान- नीरजा वाणी, तू वेडा कुंभार – आदित्य देशपांडे, चंद्रभागेच्या तीरी – अनुभूती शाळा, मनी नाही भाव- परी पाटील,. देव इंद्रायणी थांबला- भूमिका चौधरी, कानडा राजा पंढरी चा – अनुभूती शाळा, नाम तुझे घेता देवा – कुणाल पारे, बोलावा विठ्ठल – संहिता जोशी, विठू माऊली तू- आरुह्या देशपांडे, तुझे नाव आले ओठी – सर्वेषा जोशी, जगण्याचे देवा लाभो ऐसे- भार्गवी चौधरी, ज्या सुखा कारणे- आराध्य खैरनार, धाव घाली आई, आता पाहते काही – काव्या पवार आदींनी सुश्राव्य अभंगवाणी सादर केली. त्यानंतर नृत्य प्रकारात टाळ बोले चिपळीला – नूपुर चांदोरकर – खटावकर दिग्दर्शित नुपुर नृत्यांगण चे विद्यार्थी – अश्वी अग्रवाल, स्वरा चौधरी, रुद्र कपोते, दुर्वा अग्रवाल, स्वाधी नवाल, लक्ष्मी भोळे, लावण्या कुलकर्णी, कनिष्का कुलकर्णी, अनघा कुलकर्णी, ओवी धानोरकर, बघ उघडूनी दार – प्रभाकर संगीत कला अकादमी सादरकर्ते कलाकार स्मरणिका देवळे, अनन्या यादव, ऋतिका शिरसाळे, कल्याणी भामरे, प्रेक्षा बनवत, आरोही मोरे, दिव्या सोहळा पाहुनी डोळा – सानवी बुर्कुल यांनी नृत्य सादर केले. गुरुवंदना वरूण नेवे यांनी तर सूत्रसंचालन वरूण देशपांडे यांनी केले. यावेळी दोन छोट्या माऊली व्योम खटावकर व ओवी धानोरकर यांनी निरूपण सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांना तबला साथ यज्ञेश जेऊरकर यांनी केली. रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत चिमुकल्यांचे कौतुक केले.